Thu, Oct 29, 2020 08:06होमपेज › National › डिझेल दरात १० पैशांची कपात

डिझेल दरात १० पैशांची कपात

Last Updated: Oct 01 2020 4:32PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी डिझेल दरात गुरुवारी १० पैशांची कपात केली. पेट्रोलचे दर मात्र जैसे थे ठेवण्यात आले आहेत. ताज्या कपातीनंतर देशाची राजधानी दिल्लीत डिझेलचे प्रती लिटरचे दर ७०.५३ रुपयांपर्यंत खाली आले आहेत. दुसरीकडे पेट्रोलचे दर ८१.०६ रुपयांवर स्थिर आहेत. 

मुंबईमध्ये डिझेलचे दर ७६.९३ रुपयांपर्यंत कमी झाले असून कोलकाता आणि चेन्नई येथे हे दर क्रमशः ७४.०५ व ७६.०१ रुपयांवर आले आहेत. मुंबईतील पेट्रोलचे दर ८७.७४ रुपयांवर स्थिर असून कोलकाता आणि चेन्नई या शहरातील दर क्रमशः ८२.५९ आणि ८४.१४ रुपयांवर स्थिर आहेत. 

 "