Wed, May 19, 2021 05:05
नाशिक : कोरोनाने फक्त ११ दिवसात एकाच कुटुंबातील आई, वडील ,मुलाचे निधन

Last Updated: May 03 2021 3:56PM

 पिंपळनेर (नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

पिंपळनेरसह परिसरात सर्वत्र कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमुळे हाहाकार पसरला आहे. येथील सावळे परिवारातील तीन सदस्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अकरा दिवसात आई, वडील ,मुलाचे निधन झाले.

येथील प्रगतीशील शेतकरी बापू मालजी सावळे (वय ६०) यांचे दि. २० एप्रिल रोजी उपचारादरम्यान निधन झाले. त्यानंतर ६ दिवसांनी दि. २६ एप्रिल रोजी त्यांच्या पत्नी राईबाई सावळे यांचे निधन झाले. दोघा पती-पत्नीचे निधन झाल्याची वार्ता दवाखान्यात उपचार घेत असलेला त्यांचा मुलगा विकास सावळे (वय ४५) यास कळू नये, म्हणून गुप्तता पाळण्यात आली. परंतु दि. २९ एप्रिल रोजी विकासचादेखील मृत्यू ओढवला. सावळे कुटुंबीय साक्री तालुक्यातील मूळ कोकले या गावांचे रहिवासी होते. एकाच घरातील आई, वडील व मुलगा असे तिघेही कोरोनाचे बळी ठरल्याची ही पिंपळनेरमधील पहिलीच घटना आहे. विकास सावळे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ व बहिण असा परिवार आहे.

वाचा - गिरीश महाजन मुख्यमंत्र्यांजवळ बसायचे पण जळगावसाठी निधी आणला नाही, गुलाबराव पाटलांचा आरोप