Mon, Sep 28, 2020 08:10होमपेज › Nashik › नंदूरबार : ६ रूग्ण झाले कोरोनामुक्त

नंदूरबार : ६ रूग्ण झाले कोरोनामुक्त

Last Updated: Jul 02 2020 9:39PM

संग्रहित छायाचित्रनंदूरबार : पुढारी वृत्तसेवा 

एकीकडे कोरोना रूग्णांची संख्या वाढत असताना नंदुरबारकरांसाठी दिलासा दायक बाब समोर आली आहे. आज एकाच दिवशी ६ रूग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण २४६ जण बरे होऊन घरी गेले आहेत.

नंदूरबार : रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर सर्व्हे

आज डिस्चार्ज दिलेल्यांमधे नंदूरबार शहरातील कोकणी हिल भागातील १, सिंधी कॉलनीतील २, परळनगरचा १ आणि आमलाड (ता. तळोदा) येथील १, गणेशनगर शहादा येथील १ रूग्णाचा समावेश आहे. दरम्यान आज सकाळी नंदुरबार शहरातील मंगळ बाजार भागातील पॉझिटिव्ह महिलेचा मृत्यू झाला असून पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या आठ आहे.  

 "