Fri, Sep 25, 2020 17:57होमपेज › Nashik › कांदा प्रश्नी सदाभाऊंचा केंद्राला घरचा आहेर (video)

कांदा प्रश्नी सदाभाऊंचा केंद्राला घरचा आहेर (video)

Last Updated: Sep 17 2020 11:24AM

रयत क्रांती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत.लासलगाव (नाशिक) : राकेश बोरा

कांदा निर्यात बंदीचा घेतलेला निर्णय मागे घेण्याच्या मागणीसाठी आज औरंगाबाद-नाशिक राज्य मार्गावरील विंचूर येथील येथे रयत क्रांती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्यासह शेतकऱ्यांनी राज्यव्यापी आंदोलन सुरु  केले. कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट असून यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे.

वाचा : कांदा तात्पुरता सावरला

निर्यात बंदी हा सुटाबुटातल्या अधिकाऱ्यांनी घेतलेला निर्णय आहे का? सध्या शेतकऱ्यांचा हा संकटातला काळ असून त्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरवू नका, बंदरावर, बांगलादेश सीमेवर मोठ्या प्रमाणात माल पोहोचल्यानंतर अडकून ठेवलेला आहे हा माल निर्यात झाला नाही तर सडून जाईल. त्यामुळे केंद्राने प्रथम हा माल निर्यात करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली.

वाचा : कांदा निर्यात बंदी विरोधात धुळ्यात शिवसेनेचे आंदोलन

 


 

 "