Sun, Sep 20, 2020 09:50होमपेज › Nashik › नाशिक : 'मुंबई रिटर्नस्'ने सिन्नरचा ताप वाढला 

नाशिक : 'मुंबई रिटर्नस्'ने सिन्नरचा ताप वाढला 

Last Updated: May 27 2020 3:46PM

संग्रहित छायाचित्रसिन्नर (नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

सिन्नर तालुक्याच्या दृष्टीने ‘मुंबई ट्रॅव्हल हिस्ट्री' धोकेदायक ठरत आहे. सलग दुसर्‍या दिवशी बुधवारी (दि.२७) ग्रामीण भागात तिघांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे सिन्नर तालुक्यातील काही गावात भितीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान सिन्नर तालुक्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या २० वर पोहोचली आहे.

तालुक्यातील देशवंडी येथे मुंबईहून आलेल्या कोरोना बाधीत २० वर्षीय तरुणीच्या कुटुंबातील तिघांचे अहवाल (दि.२६) रोजी सायंकाळी कोरोना पॉझिटीव्ह आले. त्यात ७३ वर्षीय वृध्दाचा समावेश आहे. आज (ता.२७) पुन्हा देशवंडीतील ‘त्या’ तरुणीच्या हायरिस्क संपर्कातील सोळा वर्षीय मुलाला कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. 

वावीगावाजवळ फुलेनगर येथील ५४ वर्षीय व्यक्ती व निमगाव सिन्नर येथील २६ वर्षीय तरुण यांचेही अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. हा तरुण नाशिकरोड येथील स्थायिक असून (दि.२१) रोजी ग्रामीण रुग्णालयात दाखल झालेला आहे. दरम्यान, देशवंडीत एकूण ५ तर तालुक्यात २० कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे.

 "