Sat, Aug 15, 2020 16:57होमपेज › Nashik › प्रभू श्रीराम कुणाच्या सात बारावर नाहीत, आव्हाडांचा भाजपला टोला

प्रभू श्रीराम कुणाच्या सात बारावर नाहीत, आव्हाडांचा भाजपला टोला

Last Updated: Aug 02 2020 5:36PM

नाशिकच्या सिडको परिसरात स्व. बाळासाहेब ठाकरे कोविड रुग्णालयाचक उद्घाटन करताना आव्हाड यांनी प्रभू श्रीरामाची पूजा केली.सिडको  : पुढारी वृत्तसेवा 

प्रभू श्रीराम कुणाच्या सात बारावर नाही, तो सातबारा कुणाच्याही मालकीचा नाही, असा टोला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजपला लगावला आहे. नाशिकच्या सिडको परिसरात स्व. बाळासाहेब ठाकरे कोविड रुग्णालयाचक उद्घाटन करताना आव्हाड यांनी प्रभू श्रीरामाची पूजा केली.

वाचा : नाशिक जिल्ह्यात एकूण १५ हजार बाधित, तर ५०५ मृत्यू

‘रामाचे नाव घेऊन त्यांनी पाणी विकले, विटा विकल्या, सत्ता मिळवण्यासाठी जे जे करता येईल ते त्यांनी रामाच्या नावावर केले’, असा घणाघातही मंत्री आव्हाडांनी भाजपवर केला. 

‘कोरोनामुक्त महाराष्ट्र घडो, हीच श्रीराम चरणी प्रार्थना’, अशी मनोकामना जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली. 

ते म्हणाले की, प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या नाशिक भूमीचाच मी सुपुत्र, माझा जन्म नाशिकचा. लहानपणापासून काळाराम मंदिर माझं तोंडपाठ आहे, असेही आव्हाड यांनी सांगितले.

वाचा : खा. गोडसे यांच्या निधीतील कोरोना टेस्टिंग लॅबला मुहूर्त