Wed, Aug 05, 2020 19:47होमपेज › Nashik › मालेगाव : कोरोनालाही घाबरला नाही चोर, बाधिताच्या घरातच चोरी

कोरोनालाही घाबरला नाही चोर, बाधिताच्या घरातच चोरी

Last Updated: Jul 07 2020 8:22AM

संग्रहित छायाचित्रमालेगाव : पुढारी वृत्तसेवा

लॉकडाऊन शिथिल होताच चोरट्यांनी धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. मालेगाव शहराजवळील टेहरे गावात चोरट्यांनी संस्थात्मक क्वारंटाईन भावंडांच्या बंद घरात डल्ला मारल्याने चर्चेचा विषय ठरला आहे. याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे. कोरोनामूळे सध्या प्रत्येकाच्या अंगावर काटा येत आहे. परंतु, चोरट्यांनी थेट बाधित व्यक्तीच्या घरासह त्यांच्या संपर्कातील व्यक्तींच्या घरात हातसफाई केली.

अधिक वाचा : लॉकडाऊनमध्ये नागरिकांच्या नैराश्यात कमालीची वाढ

टेहरेतील एक व्यक्ती कोरोनाबाधित निष्पन्न झाल्याने त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना दाभाडी येथे (दि. ३) जुलैपासून क्वारंटाईन केले आहे. साधारण हाकेच्या अंतरावरील तिन्ही भावंडांची घर बंद आहेत. सदरचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला गेला असल्याने ही संधी साधत चोरट्यांनी रविवारी (ता.५) रात्री घरफोडी केली. हा प्रकार सोमवारी सकाळी निदर्शनास आला. 

अधिक वाचा :  नाशिक जिल्ह्यात २२९ नवे बाधित

भावंडांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याने ते घरी परतले त्यावेळी त्यांच्या हा प्रकार लक्षात आला. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. ठसे तज्ज्ञ व श्वान पथकाची मदत घेतली गेली. चोरट्यांनी तिन्ही घरातून दागिन्यांसह सुमारे १ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याची फिर्याद देण्यात आली आहे.