Sun, Aug 09, 2020 04:55होमपेज › Nashik › नाशिक : कोरोनामुळे द्राक्षमालास फटका

नाशिक : कोरोनामुळे द्राक्षमालास फटका

Last Updated: Mar 26 2020 6:09PM

संग्रहीत छायाचित्रनिफाड : पुढारी वृत्तसेवा 

देशभरात एकवीस दिवसाच्या लॉकडाऊनने द्राक्ष हंगामाच्या मध्यावर उत्पादकांची चांगलीच कोंडी निर्माण झाली आहे. तयार झालेल्या द्राक्षमालास बाजारपेठेत पाठविण्याच्या अडचणीसह ग्राहक वर्ग भेटेल की नाही या विवंचनेत द्राक्ष व्यापारी आहेत. तर ग्राहक असुनही पोर्टपर्यंत द्राक्षमाल पाठविण्यासाठी कंटेनरची उपलब्धी होत नसल्याने निर्यादारांचा द्राक्षमालही शितगृहात पडून आहे. राज्यातील सांगली‌, पुणे, नाशिक विभागातील द्राक्षमालाचा विचार करता सुमारे एक लाख एकरवरील द्राक्षमालाला कोरोनामुळे फटका बसला आहे. असा अंदाज महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे खजिनदार कैलास भोसले यांनी व्यक्त केला आहे. 

वाचा :नाशिकरोडमध्ये जर्मन दाम्पत्य त्यांच्या गाडीसह आल्याने खळबळ!

द्राक्षबागांच्या फळबहार छाटणीनंतर द्राक्षमालावर अवकाळी पावसाच्या थैमानाने रोग वाढले. तर पुढील काळात थंडीमुळे द्राक्षमालाच्या प्रतवारिवर परिणाम झाला, द्राक्ष हंगाम सुमारे एक‌ महिना उशीरा सुरु झाला, अन आता द्राक्ष हंगाम मध्यावर आला असतानाच कोरोनाचे गंभीर संकट उभे राहिले आहे. त्यामुळे लादलेली संचारबंदी नियम या कचाट्यात तयार द्राक्षमालास देशांतर्गत बाजारपेठेत मागणी बंद झाली आहे. द्राक्ष व्यापारी वर्गाने खरेदी बंद केली आहे. तर द्राक्षमाल वाहतूक‌ करणारे ट्रान्सपोर्ट प्रत्यक्ष बाजारपेठेत द्राक्षमाल पोहोचण्यास वाहतुकीच्या येणाऱ्या अडचणीमुळे हतबल झाले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य व केंद्र सराकारने लादलेल्या नियमांमुळे जिल्हा बंदी द्राक्षमाल काढणी, त्याची पॅकिंग करणे, तसेच शितगृहात द्राक्षमालाची विरळणी करुन तो सिलबंद करणे याकरिता मजूर येण्यास तयार नाहीत. तर दुसरीकडे द्राक्षमाल परिपक्व होऊन त्याचा निर्धारीत चार पाच महिन्याचा कालावधी होऊनही काढला गेला नाही. तर द्राक्षमणी सुकवा पकडतील त्यातून मोठे आर्थिक नुकसान द्राक्ष उत्पादकांचे होणार आहे .

वाचा :सिडको : दोन विदेशी क्‍वॉरंटाईन नागरिक पोलिसांच्या ताब्‍यात 

 द्राक्षमालावर प्रक्रिया करण्याकडे कल 

द्राक्षबागेतील द्राक्षमाल काढला गेला नाही तर झाड कमकुवत होईल, त्याचा परिणाम पुढील हंगामासाठी उत्पादन घेता येणार नाही हा धोका लक्षात घेता बहुसंख्य द्राक्ष उत्पादक द्राक्षमालाचा बेदाणा तयार करुन घेण्याचा विचार करत आहेत. मात्र त्यासाठी लागणारा मजूर वर्ग मिळेना‌ तसेच पुरक औषधे, नेट, गंधक याची उपलब्धी करण्यात लॉकडाऊनने मोठा अडथळा आला आहे. तर निर्यातक्षम द्राक्षमाल शितगृहात साठविण्याची तयारी आहे. मात्र त्यासाठी आवश्यक जागा शितगृहात मिळत नसल्याने द्राक्ष उत्पादकांचे कुटुंबच हतबल होऊन झाले आहे. 

वाचा :मालेगाव : सामान्य रुग्णालयात आमदारांसमक्ष वैद्यकीय अधीक्षकांना धक्काबुक्की

द्राक्षमाल देशांतर्गत बाजारपेठेत रवाना करण्याच्या अडचणी 

तयार झालेला द्राक्षमाल देशांतर्गत बाजारपेठेत रवाना करण्याच्या अडचणी आहेत. तसेच पाठविलेला द्राक्षमाल बाजारपेठेत संचार बंदीमुळे खरेदी केला जाईल की, नाही याबाबत व्यापारी अनभिज्ञ आहेत. त्यामुळे द्राक्षमालाचे व्यवहार मोडले आहेत. तर द्राक्ष हंगामात पॅकिंग लोडिंग विरळणी वाहतूक अशा विविध क्षेत्रात काम करणारे हजारो कामगार बेरोजगार झाले आहेत. 

- अण्णासाहेब सोनवणे, समर्थ ट्रान्सपोर्ट शिवडी ता. निफाड 

वाचा :जिल्ह्यात ठिकठिकाणी बेमोसमी पावसाचे थैमान