Fri, Oct 02, 2020 01:04होमपेज › Nashik › धुळ्यात कोरोना रुग्णसंख्या ५ हजारांच्या पार

धुळ्यात कोरोना रुग्णसंख्या ५ हजारांच्या पार

Last Updated: Aug 14 2020 10:19AM
धुळे : पुढारी वृत्तसेवा

धुळे जिल्ह्यातील आणखी चौघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर एकाच दिवसात 222 बाधित आढळल्याने बाधितांचा आकडा पाच हजारांच्या पार गेला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या ५००८ इतकी झाली आहे. तसेच ३ हजार ४५९ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले असले तरीही रुग्णवाढीचा आकडा हा प्रशासनाची चिंता वाढवणारा आहे.

अधिक वाचा : नाशिक जिल्ह्यात २० मृत्यू; ६४६ नवे कोरोनाबाधित

धुळे जिल्ह्यात कोरोनाचा प्रकोप दिवसागणिक वाढतच आहे. जिल्ह्यात प्रतिदिवशी रुग्णसंख्येत तीन आकडी संख्येने  वाढ होत आहे. रात्री आलेल्या अहवालात एकाच गुरुवारी (दि.१३) दिवसात २२२ रुग्ण वाढले आहेत. यामध्ये सर्वांधिक १०० बाधित धुळे शहरातील आहेत. त्यापाठोपाठ सिंदखेड्यात ४०, शिरपूरमध्ये ३२, धुळे तालुक्यात ३३ व साक्रीत १७ तर अन्य जिल्हयातील ५ बाधित आढळून आले आहेत. दरम्यान वैद्यकीय महाविद्यालयात आणखी चार बाधितांचा मृत्यू झाला आहे. यात धुळे तालुक्यातील मुकटी येथील ८४ वर्षीय पुरुष, दोडाईचा येथील शहादा रोडवरील ७५ वर्षीय महिला, धुळे शहरातील ऐंशी फुटी रोड वरील ५८ वर्षीय पुरुष तर खासगी रुग्णालयात शिंदखेडा येथील ६९ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. आता पर्यंत धुळे जिल्ह्यात १५४ जणांचा या आजाराने बळी घेतला आहे. धुळे शहरात ७७, धुळे ग्रामीणमध्ये २२, शिरपूरमध्ये ३०, सिंदखेडयात १३, साक्रीत १२ जणांचा बळी गेला आहे. 

अधिक वाचा : गेल्यावर्षी ऑगस्टमध्येच ओलांडली सरासरी

 "