Wed, May 19, 2021 05:43
जळगाव : कारचा टायर फुटल्याने भीषण अपघात; एक जागीच ठार

Last Updated: May 04 2021 5:57PM

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

पाचोरा - भडगाव रस्त्याजवळ असलेल्या अंकिता कॉटनजवळ कारचा टायर फुटून अपघात झाला. टायर फुटून गाडी डाव्या बाजूने उजव्या बाजूला भरधाव फिरली. त्यामुळे पाचोऱ्याकडे जाणाऱ्या आयशरला कारची धडक बसली. या धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर कार चालक गंभीर जखमी झाला .

वाचा :नाशिक : कोरोनाने फक्त ११ दिवसात एकाच कुटुंबातील आई, वडील ,मुलाचे निधन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, पाचोरा-भडगाव रस्त्यालगत असलेल्या अंकिता कॉटनजवळ पाचोऱ्याकडून भडगावकडे जाणाऱ्या इंडीगो (सीएस) एम. एच.  ०३ ए. एफ. २४००  या कारचे टायर फुटल्याने गाडी डाव्या बाजुने उजव्या बाजुस भरधाव वेगाने फिरली. व भडगावकडून पाचोऱ्याकडे येणाऱ्या आयशर (क्रं. एम. एच. ०४ जे. के. ८१८२) ची कारला जोरदार धडक बसल्याने या अपघातात इंडीगो कारचा चक्काचूर झाला. या अपघातात कार चालक जिग्नेश छबूलाल पाटील वय – ३० (रा. भुवणे ता. धरणगाव) यांना जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मुत्यू झाला.

अपघाताची माहिती पाचोरा पोलिसांना मिळताच घटनास्थळी कॉन्स्टेबल किरण पाटील यांनी घटनास्थळी धाव घेवुन अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजुला घेत जिग्नेश यांचा मृतदेह रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात केला. सदर घटनेबाबत पाचोरा पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अपघातातील दोन्ही वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल हंसराज मोरे व अजय मालचे करीत आहे.

वाचा : अवघ्या अर्ध्या तासात ३० टन कांद्यावर डल्ला!