होमपेज › Nashik › व्हेंटीलेटर न मिळाल्याने भुसावळातील कोरोनावर मात करणाऱ्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू

व्हेंटीलेटर न मिळाल्याने भुसावळातील कोरोनावर मात करणाऱ्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू

Last Updated: Jul 08 2020 4:23PM




जळगाव : वृत्तसेवा 

भुसावळ शहरात एप्रिल महिन्यात पहिल्या कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेल्या ३८ वर्षीय महिलेचा सोमवारी रात्री व्हेंटीलेटर नसल्याने गोदावरी रुग्णालयात मृत्यू झाला. सोमवारी रात्रीच या महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मृत्यूनंतर आला कोरोना पॉझिटिव्ह अहवाल; नंदुरबारमधील तिसरी घटना

भुसावळ शहरातील समतां नगर येथील महिलेस २५ एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. यानंतर भुसावळ शहरात खळबळ उडाली होती. शिवाय शहरात प्रथमच कोरोना पॉझिटिव्ह आढळलेली ही महिला असल्याने प्रशासनाने सर्व खबरदारी बाळगत या भागात कंटेन्मेंट झोन तयार केला होता. महिलेवर यशस्वी उपचार झाल्याने तिने कोरोनावर विजयही मिळवला होता. 

रुग्णसंख्या लपवण्यासाठी राज्य सरकारकडून कमी चाचण्या : देवेंद्र फडणवीस 

पण सोमवारी याच महिलेला अस्वस्थ वाटू लागल्यानंतर डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र नॉन कोविड रुग्णांसाठी व्हेंटीलेटर उपलब्ध नसल्याने आणि त्या महिलेला श्वास घेण्यास अधिक त्रास होत असल्याने त्यांचा मृत्यू झाला. मृत महिला विद्यार्थ्यांच्या शिकवणी घेवून आपले कुटुंबं चालवत होत्या.

महिलेचा जीव वाचला असता : उल्हास पगारे

राष्ट्रवादीचे नगरसेवक उल्हास पगारे म्हणाले की, या महिलेला निमोनिया झाल्याने त्यांना गोदावरीला हलवण्यात आले मात्र नॉन कोविड रुग्णांसाठी व्हेंटीलेटरची सोय नसल्याने प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांच्याशी संपर्क साधला व त्यांनीदेखील प्रयत्न केले मात्र यश आले नाही. वेळेत या महिलेस व्हेंटीलेटर मिळाला असता तर कदाचित महिलेचे प्राण वाचले असते. शासनाने नॉन कोविड रुग्णांसाठी देखील व्हेंटीलेटरची व्यवस्था करण्याची मागणी लोकप्रतिनिधींच्या बैठकीत आपण केली असून शासनाने याची दखल घेणे गरजेचे असल्याचे पगारे म्हणाले.