Mon, Jan 18, 2021 19:31
नंदुरबार : ग्रामपंचायत निवडणूक; मतदानाच्या दिवशी ग्रामीण मतदारांना पगारी सुट्टी

Last Updated: Jan 14 2021 6:38PM
नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यातील ६४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकींसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. निवडणूक क्षेत्रातील सर्व मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भरपगारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. (Voters will get paid leave on polling day in nandurbar)

वाचा : नंदुरबार जिल्ह्यात कोरोना पुन्हा सक्रीय; एकाच दिवशी ३ मृत्यू

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुक होणाऱ्या ग्रामपंचायतीपैकी नागरी क्षेत्रालगतच्या (विशेषत : नगरपालिका क्षेत्रालगतच्या) मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये राहणारे बहुतांश मतदार हे नगरपालिका क्षेत्रात काम करतात. ते येथील सार्वजनिक उपक्रमाच्या आस्थापना, दुकाने, औद्योगिक आस्थापना (एमआयडीसी) इत्यादी ठिकाणी ये-जा करत असतात. अशा मतदारांना मतदान करता यावे, मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी राज्य निवडणूक आयोगाने प्रयत्न सुरू केले आहेत. त्याअंतर्गत निवडणुक क्षेत्रातील सर्व आस्थापना, निवासी हॉटेल्स, खाद्य गृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना या मधील कामगारांना मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी किंवा विशेष सवलत दिली जाणार आहे.

वाचा : नंदुरबार : अपसंपदा प्रकरणी गावित दाम्पत्याला अटकपूर्व जामीन मंजूर 

]शहरी भागात किंवा निवडणुका नसलेल्या ग्रामीण भागातील दुकाने, कंपन्या, आस्थापना बंद ठेवण्याची आवश्यकता नाही. सर्व आस्थापना मालकांनी या आदेशाचे पालन करावे असे सरकारी कामगार अधिकारी धुळे यांनी कळविले आहे.