Thu, Oct 29, 2020 08:14होमपेज › Nashik › रावेर हत्याकांड प्रकरणी आरोपींवर अतिरिक्त कलमे

जळगाव : रावेर हत्याकांड प्रकरणी आरोपींवर अतिरिक्त कलमे

Last Updated: Oct 18 2020 8:40PM
जळगाव : पुढारी वृत्तसंस्था

रावेर येथे चार बालकांचे निर्घुण हत्याकांड प्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध दाखल गुन्ह्यात लैंगिक अत्याचार व बालक संरक्षण कायद्यांतर्गत वाढ करण्यात आली आहे. गुन्ह्यातील काही सशंयित ताब्यात असून परीस्थिती जन्य पुरावे हाती लागलेले आहेत. चार वेगवेगळ्या टीमच्या माध्यमातून सखोल तपास सुरु असल्याची माहिती नाशिक परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर यांनी रविवारी (दि. १८) सायंकाळी रावेर  येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. 

रावेर शहरालगत असलेल्या बोरखेडा रस्त्यावर शुक्रवारी चार बालकांची निर्घुण हत्या झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली आहे. या संदर्भात रविवारी सायंकाळी पोलिस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर व जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी दिघावकर यांनी माहिती देताना सांगितले की, या गुन्ह्यात कलम ३७६ (अ) व ४५२ लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४,६,८,१०,१२ कलमान्वये वाढ करण्यात आली आहे. परिस्थितीजन्य पुरावे सापडले असून विविध अंगाने चार पथकाद्वारे तपासणी करण्यात येत आहे. संशयितांना ताब्यात घेतले असून मिळालेल्या माहितीची क्रॉस चेकींग केली जात असल्याचे ते म्हणाले. दरम्यान आरोपी व तपासणी अहवालाबाबत अधिकाऱ्यांनी मौन पाळल्याचे दिसून येत आहे. 

लोकसंघर्ष मोर्चा आंदोलनाच्या तयारीत 

गेल्या तीन दिवसांपासून पोलिस संशयितांची चौकशी करत आहे. आरोपी अटक करत नाही. पीडितांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन करण्याचा पावित्रा लोकसंघर्ष मोर्चाने घेतल्याचे प्रतिभा शिंदे यांनी सांगितले. 

 "