Fri, Sep 25, 2020 19:16होमपेज › Nashik › नंदुरबार : तापी, शवण नदीच्या पुराचा धोका वाढला

नंदुरबार : तापी, शवण नदीच्या पुराचा धोका वाढला

Last Updated: Aug 14 2020 3:43PM

संग्रहीत छायाचित्रनंदुरबार : पुढारी वृत्तसेवा

पावसाळा सुरू झाल्यापासून निराशा करणाऱ्या पावसाची सध्या जोरदार बॅटींग सुरु आहे. मागील चार- पाच दिवसांपासून धो-धो पाऊस सुरु आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धरणे व प्रकल्पांमध्ये ६४ टक्के इतका पाणीसाठा निर्माण झाला. तर शिवण नदी आणि तापी नदीचा पूर धोक्याच्या पातळीवर येऊ लागल्याने काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

अधिक वाचा : धुळ्यात कोरोना रुग्णसंख्या ५ हजारांच्या पार

आता पर्यंत वार्षिक सरासरीच्या ७० टक्के पावसाची नोंद झाली आहे. सारंखेडा धरणामध्ये ५१ टक्के तर प्रकाशा धरणामध्ये ६४ टक्के पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील बारा लघु प्रकल्प ४३ टक्के व मध्य्यम प्रकल्प ६५ टक्क्यांनी भरले आहेत.

सध्या शिवण मध्यम प्रकल्पातून १००० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे नदी काठावरील ११ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदी काठावरील  विरचेक, बिलाडी, खामगाव, सुंदरदे, करणखेडा, बंद्रीझिरा, नवातांडा, भवाली, धुळवड, नारायणपूर , व्याहुर या गावाच्या ग्रामस्थांना अतिदक्षता घेण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

अधिक वाचा : जळगाव : हतनूर धरणाचे २४ दरवाजे पूर्ण उघडले 

प्रकाशा धरणाची आजची पाणी पातळी १०८ मीटरहून अधिक आहे. म्हणून तापीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तापी नदीपात्रात पाण्याची सातत्याने आवक होत असल्याने पाणी पातळीत वाढ होत आहे. पुढील ७२ तासापर्यंत पाणी पातळीत सतत वाढ होणार असल्याने तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

जळगाव जिल्ह्यातील हतनूर प्रकल्पाचे २४ दरवाजे उघडले असून ७५,१२५ क्युसेक्स इतका विसर्ग तापी नदीपात्रात सोडण्यात आला आहे. त्याचप्रमाणे जळगाव जिल्ह्यातील नदीतील पाणी काही कालावधीत तापी नदीत दाखल होण्याची शक्यता असल्याने हतनूर धरणाचा पाणी विसर्ग अजून वाढणार आहे. पाण्याची पातळी नियंत्रित करण्यासाठी आज सकाळी ८ वाजता प्रकाशा धरणाचे ४ दरवाजे २ मीटर उंचीने उघडण्यात आले असून २५ हजार ६१ क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे. तर सारंगखेडा धरणाचे ४ दरवाजे २ मीटर उंचीने उघडण्यात आले असून २८ हजार १९ क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे. पाण्याची पातळी नियंत्रित करण्याकरिता विसर्ग वाढविण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा : नाशिक जिल्ह्यात २० मृत्यू; ६४६ नवे कोरोनाबाधित

नंदुरबार जिल्ह्यातील झालेला पाऊस (कंसात एकूण पाऊस मीमी मध्ये)

1.नंदुरबार - ५९ मीमी (५५१)
2.नवापूर - ८० मीमी (५१२.३)
3. तळोदा - ६८ मीमी (५८८)
4. शहादा - ६१ मीमी (५९५)
5.अक्कलकुवा - १३८ मीमी (५८४)
6. अकरणी - ५८ मीमी (४५३)

 "