Sun, Aug 09, 2020 14:48होमपेज › Nashik › जळगाव शहरासह भुसावळ, अमळनेरात आठवडाभर लॉकडाऊन!

जळगाव शहरासह भुसावळ, अमळनेरात आठवडाभर लॉकडाऊन!

Last Updated: Jul 04 2020 5:05PM

संग्रहित छायाचित्रजळगाव : पुढारी ऑनलाईन

जळगाव जिल्ह्यात गेल्या सहा दिवसांपासून बाधितांचा शंभरी दोनशेने आकडा वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यात चिंताजनक परिस्थिती झाली आहे. जिल्ह्याचा एकुण कोरोना रुग्णांचा आकडा ४ हजारांच्या पार गेला आहे. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याने ७ ते 13 जुलै पर्यंत जळगाव शहर, भुसावळ, अमळनेर याठिकाणी लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. 

अधिक वाचा : देशात एका दिवसात २२ हजारांहून अधिक रूग्ण

जिल्ह्यात आदेश निर्गमित करूनही नागरिक मोठ्या प्रमाणात अनावश्यक सार्वजनिक ठिकाणी गर्दी करीत असल्याचे दिसत होते. वाढती संख्या पाहता लोकप्रतिनिधींसह संघटनांकडून गेल्या काही दिवसांपासून लॉकडाऊनची मागणी समोर येत होती.

अधिक वाचा : ठाणे जिल्ह्यात विक्रमी २०२७ नवे कोरोना रुग्ण

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जळगाव शहर महानगरपालिका, भुसावळ आणि अमळनेर नगरपालिका क्षेत्र या ठिकाणी लॉकडाऊन जाहीर केला आहे. या काळात औषधी दुकाने, दुधविक्री, खरेदी करता येणार आहे. कोणत्याही स्वंयचलित वाहनाचा या कालावधीत वापर करता येणार नाही. 

अधिक वाचा :'खिलाडी'ची हवाई भरारी वादात, छगन भुजबळांनी दिले चौकशीचे आदेश  

जळगाव, भुसावळ, अमळनेर या मनपा नपा क्षेत्राच्या बाहेर शेती आहे अशा शेतकऱ्यांना केवळ शेती विषयक कामे करण्यासाठी बी बियाणे खरेदी करण्यासाठी बाहेर जाता येईल. या क्षेत्रातील एमआयडीसी सोडून सर्व दुकाने बंद राहतील. तसेच पेट्रोल पंपावर अत्यावश्यक असणाऱ्या वाहनांनाच इंधन मिळेल.