Tue, Sep 29, 2020 10:21होमपेज › Nashik › जळगाव : अल्पवयीन गतिमंद मुलीवर अत्याचार करणाऱ्या वृद्धाला मरेपर्यंत जन्मठेप

जळगाव : अल्पवयीन गतिमंद मुलीवर अत्याचार करणाऱ्या वृद्धाला मरेपर्यंत जन्मठेप

Last Updated: Aug 14 2020 5:25PM

संग्रहीत छायाचित्रजळगाव : पुढारी वृत्तसेवा

एरंडोल तालुक्यातील उत्राण येथील एका अल्पवयीन गतिमंद मुलीवर अत्याचार करणाऱ्या ६५ वर्षीय वृद्धाला मरेपर्यंत जन्मठेपेसह पाच हजार रुपये दंडाची शिक्षा जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. आर. जे. कटारिया यांनी सुनावली. या पीडितेवर अत्याचाराची घटना घडली तेंव्हा ती ९ वर्षांची होती.

जळगाव : हतनूर धरणाचे २४ दरवाजे पूर्ण उघडले 

अधिक माहिती अशी की, उत्राण येथे २१ एप्रिल २०१९ रोजी ही घटना घडल्यानंतर कासोदा पोलिस ठाण्यात या खटल्यातील दोषी लोटन फकिरा पाटीलच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आरोपी लोटन फकिरा पाटील याला पोलिसांनी त्याच रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास उत्राण गावातून अटक केली होती. पोलिसांनी अटक केल्यापासून हा दोषी न्यायालयीन कोठडीत आहे.

तपासी अंमलदार सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील पवार यांनी २४ जून २०१९ रोजी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. १५ नोव्हेंबर २०१९ रोजी खटल्याच्या सुनावणीला प्रारंभ झाल्यानंतर १४ साक्षीदार तपासण्यात आले. पीडितेची आई, वडील, पंच, पोलिस कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी, न्याय वैद्यक प्रयोगशाळेतील कर्मचारी, डी.एन.ए. तज्ज्ञ आणि ग्राम विकास अधिकाऱ्याचा साक्षीदारांमध्ये समावेश होता. ६ मार्च २०२० रोजी शेवटचा साक्षीदार तपासण्यात आला. प्रभावी युक्तिवाद आणि निःसंशय साक्षी पुराव्यांच्या आधारावर या आरोपीला न्यायालयाने शिक्षा सुनावली. फिर्यादी पक्षाची बाजू जिल्हा सरकारी वकील ॲड. केतन ढाके यांनी तर आरोपीची बाजू ॲड. सचिन पाटील यांनी मांडली.

 "