Wed, Aug 12, 2020 00:06होमपेज › Nashik › नंदुरबार : बिबट्याने घेतला बालिकेचा बळी

नंदुरबार : बिबट्याने घेतला बालिकेचा बळी

Last Updated: Jul 17 2020 1:42AM

संग्रहित छायाचित्रनंदुरबार : पुढारी वृत्तसेवा

तळोदा तालुक्यातील सोजरबार येथे आज पहाटेच्या सुमारास झोपडीत झोपलेल्या एका चार वर्षीय बलिकेला बिबट्याने उचलून नेत ठार मारल्याने खळबळ उडाली आहे. तळोदा तालुक्याच्या वेगवेगळ्या भागात वर्षभरापासून बिबट्याने धुमाकूळ घातलेला असतानाही योग्य बंदोबस्त होत नसल्यामुळे संतप्त भावना व्यक्त होत आहेत. काही दिवसांपूर्वीच चक्क तळोदा शहरातील महाविद्यालय परिसरात बिबट्या फिरत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले होते. तेव्हापासून शहरवासीय सुद्धा भयभीत झालेले आहेत. 

हतनूरचे ३६ दरवाजे उघडले; तापी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा 

दरम्यान, सोजरबार (ता.तळोदा) येथे आज गुरूवार (दि १६ रोजी) पहाटेच्या सुमारास बिबटयाने झोपडी झोपलेल्या चार वर्षीय बालिकेस उचलून नेवून ठार केल्याची घटना घडली. तेथील लोकांनी दिलेल्या माहितीनुसार झोपडीत झोपलेल्या एका चार वर्षीय बलिकेला बिबट्याने उचलून नेले तेव्हा मुलीने आरडाओरड केली. तिच्या आवाजाने तिच्या वडिलांना जाग आली. त्यांनी बिबट्याचा पाठलाग केला. परंतु बिबट्याने मुलीस काही अंतरावर टाकून देत पळ काढला. तोपर्यंत बालिकेचा मृत्यू झाला होता.

वन विभागाकडून घटनास्थळी जाऊन पाहणी केली. वनक्षेत्रपाल सी.डी.कासार, सहायक वनसंरक्षक कापसे, वनक्षेत्रपाल अक्कलकुवा सोनाली गिरी, हवालदार मोहन वळवी, पो.नाईक, दिनकर गुले, बोरदचे वनपाल आंनद पाटील, वनरक्षक आर.जे. शिरसाठ, विरसिंग पावरा, राज्या पावरा, श्रावण कुंवर, एस.आर.देसले यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.