Fri, Feb 26, 2021 06:07
जळगाव : अल्‍पवयीन मुलीवर शेजारच्या व्यक्‍तीकडून अत्‍याचार; गुन्हा दाखल 

Last Updated: Feb 23 2021 9:35AM

जळगाव : पुढारी वृत्‍तसेवा

मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदा येथील (१७ वर्षीय) अल्पवयीन मुलीवर गावातील तरूणाने अत्याचार केल्याची घटना उघडकीला आली आहे. या प्रकरणी संशयीत तरूणाला एमआयडीसी पोलिसांनी रात्री उशिराने अटक केली असून, त्‍याला पुढील कारवाईसाठी मुक्ताईनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

अधिक माहिती अशी की, मध्य प्रदेशातील नेपानगर येथील रहिवाशी असलेली अल्पवयीन मुलगी आपल्या आई-वडिलांसह मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदा येथे राहते. आई-वडील आणि काका उदरनिर्वाह करून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. मुलीच्या काकाची घराच्या बाजूला असलेल्‍या पत्र्याच्या खोलीत पिठाची गिरण आहे. दरम्यान, त्यांच्या घराच्या शेजारी चेतन रविंद्र सुतार हा राहतो. दि. 22 रोजी दुपारी १२.४० वाजण्याच्या सुमारास अल्पवयीन मुलगी चप्पल घेण्यासाठी पिठाच्या गिरणीत गेली असता, त्या ठिकाणी आधीपासून दबा ठेवून असलेला चेतन सुतार होता. त्याने मुलीचा हात पकडून तिच्या तोंडावर रूमाल बांधून मुलीवर अत्‍याचार केला.

दरम्यान मुलीने पायाने पत्र्याच्या शेडला लाथा मारल्याने पत्र्यांच्या आवाजामुळे पीडित मुलीचे आईवडील तेथे आले. त्‍यावेळी त्‍यांच्या मुलीवर अत्याचार केल्याचे त्‍यांना दिसून आले. नातेवाईक आल्याचे पाहून चेतन सुतारने घटनास्थळाहून पळ काढला. रात्री उशीरा जळगाव एमआयडीसी पोलिसांनी चेतन सुतार याला अटक केली आहे. त्याच्या विरूध्द पोक्सो कायद्यान्वये मुक्ताईनगर पोलिसं शयित आरोपी स्‍टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय अधिकारी विवेक लावण हे करीत आहे.