Mon, Apr 12, 2021 04:05
'नाशिकमध्ये ऑक्सिजन सुरळीत व्हायचे असेल तर वाहनाची व्यवस्था करा'

Last Updated: Apr 08 2021 4:04PM

सिडको : पुढारी वृत्तसेवा

शहरात एकीकडे रुग्णांना हॉस्पिटलचे बेड मिळत नाहीत तर दुसरीकडे ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. शहरात सुमारे सत्तर ते ऐंशी हजार लिटर ऑक्सिजनचा पुरवठा गरजेचा आहे. मात्र प्रत्यक्षात ऑक्सिजन कंपनीकडून ३५ हजार लिटर ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. यामुळे उत्पादक कंपन्यांना वाहतूक करण्यासाठी अवघ्या एका टँकरची आवश्यकता आहे. दुर्दैवाने ती व्यवस्था होत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना ऑक्सिजनसाठी धावपळ करावी लागत आहे, अशी माहिती पिनॅकल गॅस इंडस्ट्रीजचे संचालक अमोल जाधव यांनी सांगितले.

अधिक वाचा : ‘ट्रकभर पुरावे’, ‘पाठीत खंजीर’ ते... शरद पवारांवरील आरोपांचे पुढे काय झाले?

गेल्या वर्षभरात जिल्ह्यात १ लाख, अठ्ठ्याहत्तर हजार, दोनशे चौदा इतके पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. तर सुमारे २३७४ रुग्णांचा मृत्यू झाला. यात मुख्यत: ऑक्सिजनचा पुरवठा योग्यवेळी उपलब्ध न झाल्याने बहुतांश पेशंटला प्राण गमवावा लागतोय. याचबरोबर कोरोनाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणात असल्याने ऑक्सिजनची आवश्यकता शहरात भासत आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने तातडीने २० हजार लिटर क्षमतेच्या ऑक्सिजनसाठी एका वाहनाची व्यवस्था करावी अशी मागणी  होत आहे. असेही जाधव यांनी सांगितले.

अधिक वाचा : भाजपला धक्का; पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती बरखास्त

गेल्या आठ महिन्यांपासून प्रशासनाकडे तातडीने एका टँकरची मागणी होत आहे; परंतु नाशिक शहरासाठी आज एकही स्वतंत्र: गाडी नसल्याने लिक्विड स्वरुपात ऑक्सिजन उपलब्ध आहे. शहरातील ७०टक्के हॉस्पिटलला ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा पिनॅकल मार्फत होतो. शिवाय ऑक्सिजनसाठा करण्याचीही क्षमता आमच्याकडे आहे. यासाठी चेन्नईहून स्वतंत्र अशी गॅस टाकी मागवण्यात आली आहे. जिल्हयात व  धूळेसह इतर शहरात आमच्याकडून ऑक्सिजन घेऊन जात आहे. नाशिक शहरात प्रशासनाने गॅस वाहतूक वाहनाची व्यवस्था केल्यास ऑक्सिजनचा पुरवठा व प्रश्न बऱ्यापैकी मार्गी लागेल. असेही जाधव यांनी सांगितले.