Wed, Aug 05, 2020 19:23होमपेज › Nashik › नाशिक : शनिमंदीर परिसरात मुसळधार पाऊस 

नाशिक : शनिमंदीर परिसरात मुसळधार पाऊस 

Last Updated: Jul 04 2020 8:02PM
नांदगाव : पुढारी वृत्तसेवा

साडेतीन शनी पीठांपैकी पूर्ण पीठ असलेल्या नांदगाव नस्तनपूर येथील शनी मंदीर मुसळधार पावसाने जलमय झाले आहे. सलग दुसऱ्यांदा हे पीठ जलमय झाले असल्याने शनिंदीर येथे तारांबळ उडाली.

ट्रस्टीचे जनरल सेक्रेटरी माजी आमदार अनिल आहेर यांनी ही माहिती दिली. मागील आठवड्यात झालेल्या पावसाने देखील शनिंदीर परिसर जलमय झाले होते. दि. ४ रोजी सायंकाळी ७ वा. झालेल्या पावसाने हा परिसर जलमय झाला आहे.

येथील जिंम, पाळणा बाग, गार्डन, मदीर परिसर, अतुथीग्रह परीसर, गाळे परिसर आदीसह सर्वच भागात पाणी झाले आहे. येथे सलग मोठ्या प्रामणात पाऊस होत असल्याने परिसर जलमय होत आहे. तालुक्यात आज दि. ४ रोजी पुर्वभागाकडील, नस्तनपूर, शनिंमदीर, पिंपरखेड, न्याडोंगरी, परधाडी, हिंगणे, देहरे, रणखेडा, जळगाव खु, जळगाव बु, आदी भागात प्रचंडप्रमाणात पाऊस झाला. या पावसाने हाहाकार उडाला.