Tue, Sep 29, 2020 08:43होमपेज › Nashik › डॉ. भारती पवार यांचा भाजपा प्रवेश तुर्त स्थगित

डॉ. भारती पवार यांचा भाजपा प्रवेश तुर्त स्थगित

Published On: Mar 17 2019 5:29PM | Last Updated: Mar 17 2019 5:18PM
ओझर : वार्ताहर

दिंडोरी लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी नाकारल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या जि. प. सदस्या डॉ. भारती पवार यांच्या भाजपा प्रवेशाला नाट्यमयरित्या वळण मिळत आहे. भारती पवार यांनी आपला भाजप प्रवेश तुर्त स्थगित केला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सध्या तरी दिंडोरी लोकसभेची उमेदवारी बाबत सपेन्स कायम असुन खा. हरिश्चंद्र चव्हाण यांच्या सर्मथकांकडुन उमेदवारी चव्हाण यांनाच मिळणार असल्याचा दावा केला जात आहे.

दिंडोरी लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारल्या नंतर डॉ. भारती पवार यांनी मुंबईत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. भाजपकडुन उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले होते. डॉ. पवार यांच्या उमेदवारी बाबत भाजपाच्या कोअर कमिटीने शिक्कामोर्तब देखील केल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. याच दरम्यान विद्यमान खा. हरिश्चंद्र चव्हाण यांनी देखील लॉबिंग करीत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेत उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्न केले. 

यावेळी खा. चव्हाण यांनी पक्षाला गरज असताना आपला अपघात झालेला असतानाही आपण एका मतासाठी एअर अॅबुलन्सने दिल्ली गाठत पक्षनिष्ठा सिध्द केल्याचे पटवुन देत उमेदवारी साठी दावा ठोकला. तर खा. चव्हाण यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी संपर्क साधत गडकरी यांच्याच माध्यमातुन पुन्हा उमेदवारीसाठी प्रयत्नशील असुन त्यामुळेच डॉ. भारती पवार यांना भाजपाच्या वरीष्ठ नेत्यांनी थांबण्यास सांगितले आहे. या सर्व घडामोडीत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस युतीच्या मेळाव्यात दिंडोरी लोकसभा मतदार संघाची उमेदवारी कोणाला जाहीर करतात का याकडे भाजप कार्यकर्त्यांचे लक्ष लागुन आहे.

भाजपा प्रवेश ही माध्यमातुन चर्चा

माझा भाजपा प्रवेश हि माध्यमातील चर्चा असुन अजुन आम्ही कोणतीही भुमिका घेतलेली नसल्याचे डॉ. भारती पवार म्हणाल्या. सध्या वेट अॅण्ड वॉच हि भुमिका असुन कार्यकर्त्याशी चर्चा करून अंतिम निर्णय घेणार असल्याचे डॉ. भारती पवार यावेळी सांगितले