Thu, Oct 29, 2020 04:54होमपेज › Nashik › दिलासादायक... कोरोनाबाधित घटताहेत

दिलासादायक... कोरोनाबाधित घटताहेत

Last Updated: Oct 18 2020 11:56PM
नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात कोरोनामुक्‍त होण्याचा वेग वाढला असून, रविवारी (दि.18) 938 रुग्ण कोरोनामुक्‍त झाले आहेत. तसेच 457 बाधित आढळून आले असून, ग्रामीणमध्ये 9 व शहरात एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील एकूण बाधित संख्या 89 हजार 318 इतकी असून, त्यापैकी 81 हजार 61 रुग्ण कोरोनामुक्‍त झाले, तर 1 हजार 601 बाधितांचा मृत्यू झाला आहे. तसेच जिल्ह्यात 6 हजार 656 बाधितांवर उपचार सुरू आहेत. 

रविवारी दिवसभरात ग्रामीण भागातील 527, शहरातील 381 व मालेगाव येथील 30 रुग्ण कोरोनामुक्‍त झाले आहेत. त्याचप्रमाणे ग्रामीणमध्ये 213, शहरात 228, मालेगावला 9 व परजिल्ह्यात 7 बाधित आढळून आले. रविवारी सायंकाळपर्यंत ग्रामीण भागात 3 हजार 278, शहरात 3 हजार 40, मालेगावला 201 व परजिल्ह्यात 137 बाधितांवर उपचार सुरू होते. जिल्ह्यातील 398 संशयितांचे अहवाल अद्याप प्रलंबित असून, शहरात नव्याने 783, मालेगावला 12 व ग्रामीण भागात 26 संशयित आढळून आले आहेत.

 "