Sun, Aug 09, 2020 13:24होमपेज › Nashik › नाशिक : आरोग्य पथकावर कोरोनाबाधिताचा हल्ला

नाशिक : आरोग्य पथकावर कोरोनाबाधिताचा हल्ला

Last Updated: Jul 04 2020 8:14PM

संग्रहित छायाचित्रजुने नाशिक : पुढारी वृत्तसेवा

काही दिवसांपूर्वी कोरोनाबाधित झालेल्या रुग्णावर उपचार करून घरी सोडलेल्या रुग्णाची प्रकृतीची तपासणीसाठी घरी गेलेल्या महापालिकेच्या महिला वैद्यकीय पथकावर कोरोनाबाधित रूग्णाने रागाच्या भरात हल्ला करुन महिला डॉक्टरला गंभीर केल्याची घटना आज शनिवारी (दि.४) दुपारी घडली.

याप्रकरणी संशयित सलीम इब्राहिम तांबोळी (वय ४८, रा.पंचशील नगर, जुने नाशिक) या कोरोनाबाधित रुग्णाला भद्रकाली पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला. सलिम तांबोळीची कोरोना स्वॅब चाचणी करून अहवाल निगेटिव्ह आल्यावर अटकेची कारवाई होणार असल्याची माहिती भद्रकाली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक साजन सोनावणे यांनी दिली.

वाचा : अभिनेत्री प्रिया बेर्डे करणार 'या' पक्षात प्रवेश

दरम्यान, याप्रकरणी अधिक माहिती अशी की, जुने नाशिक येथील गंजमाळच्या परिसरातील पंचशील नगर येथे राहणारा सलिम तांबोळी हा काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याने रुग्णालयात दाखल होता. उपचारानंतर त्याला घरी सोडण्यात आले होते. या दरम्यान सलिम तांबोळीची आई देखील कोरोनाबाधित झाल्याचे आढळले. त्यामुळे घरातील इतर सदस्यांची माहिती घेण्यासाठी गेलेल्या महपालिकेच्या महिला वैद्यकीय पथकाला घराच्या आत येऊन चौकशी करावी असे सलीम तांबोळीने पथकाला सांगितले. यावरून उभयतांमध्ये बाचाबाची झाली.

याचवेळी सलीम तांबोळीने रागाच्या भरात पथकावर हल्ला चढविला. पथकातील एका महिलेला जबर मारहाण केली. यात महिलेच्या मानेवर दुखापत झाल्याचे समजते. हल्ल्यातील जखमी महिलेने भद्रकाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याने पोलिसांनी सरकारी कामात अडथळाचे कलम ३५३ अन्वये गुन्हा दाखल केला व सलीम तांबोळीला ताब्यात घेतले.

दरम्यान, नाशिक शहरात महापालिकेचे एकूण १६८ महिला वैद्यकीय पथक कार्यरत असून, या महिला पथकावच हल्ला झाल्याने आरोग्यसेवकांमध्ये खळबळ उडून भीतीचे वातावरण निर्माण झाले. कोरोनासारख्या महाभयंकर महामारीत जीवाची पर्वा न करता या महिला आरोग्यसेविका कोरोना योद्धा म्हणून सेवा बजावत आहेत. कोरोनाबाधित रुग्णाकडूनच अशा प्रकारे मारहाण व हल्ला झाल्याने या घटनेचे सर्वत्र निषेध होत आहे.

या घटनेची गंभीर दखल घेत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी डॉक्टर व आरोग्यसेवकांवर हल्ले होत असेल, तर काम कोण करणार असा प्रश्न उपस्थित करून कोरोनाच्या भीषण परिस्थितीत डॉक्टर, आरोग्यसेवकांवर हल्ला करणाऱ्यांवर केल्यास कठोरात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

वाचा : नाशिक : शनिमंदीर परिसरात मुसळधार पाऊस