Fri, Feb 26, 2021 05:56
जळगावात कोरोनाचे टेंशन वाढले, ३१९ नवीन कोरोना रुग्ण, चार जणांचा मृत्यू 

Last Updated: Feb 22 2021 8:32PM

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट झाला. आज सोमवारी पुन्हा कोरोना रूग्णसंख्येत मोठी वाढ झाली. नव्याने ३१९ रूग्ण आढळून आले असून चार जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाची वाढती रूग्णसंख्या लक्षात घेता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेल्या निर्देशानंतर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत संचारबंदी जाहीर केली आहे. ही संचारबंदी आजपासून रात्री दहा ते पहाटे पाचपर्यंत असेल. तर जिल्ह्यातील शाळा, कॉलेज व क्लासेससह सार्वजनीक कार्यक्रमांवर देखील बंदी घालण्यात आले आहे.

यात जळगाव शहरातील सर्वाधिक रूग्णांचा १५८ रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण ५८ हजार ८५४ बाधितांची नोंद झाली आहे. इतर तालुक्यांमध्ये जळगाव ग्रामीण ०६, भुसावळ १२, अमळनेर २०, चोपडा १८, पाचोरा ४, भडगाव ७, धरणगाव ४, यावल ४, जामनेर ४, पारोळा १, चाळीसगाव ७१, मुक्ताईनगर ७ आणि इतर जिह्यातील ३ असे एकूण ३१९ रुग्ण आढळून आले आहे. दिवसभरात जळगाव शहरातील १ भुसावळ तालुक्यातील २ आणि चाळीसगाव तालुक्यातील १ असे एकूण चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे.