Mon, Aug 10, 2020 21:35होमपेज › Nashik › जळगाव : तीन चोरट्यांकडून २४ मोटारसायकली जप्त

जळगाव : तीन चोरट्यांकडून २४ मोटारसायकली जप्त

Last Updated: Jul 11 2020 3:44PM

संग्रहित छायाचित्रजळगाव : पुढारी वृत्तसेवा 

चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी चाळीसगाव, मालेगाव, धुळे व इतर ठिकाणांहून मोटारसायकली चोरुन त्या विक्री करणाऱ्या तिघांना अटक केली आहे. चोरट्यांकडून ११ लाख ४० हजार रूपयांच्या २४ मोटारसायकल पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी मुख्य आरोपी विवेक शिवाजी महाले (रा. बहाळ) याच्यांकडून ८ मोटारसायकली, दुसरा आरोपी ईश्वर शिवलाल भोई (रा. बहाळ) याच्याकडून ७ मोटारसायकली, तर तिसरा आरोपी आकाश ज्ञानेश्वर महाले याच्याकडून ९ मोटारसायकली जप्त केल्या आहेत. या जप्त करण्यात आलेल्या २४ मोटारसायकलची किंमत ११ लाख ४० हजार रुपये आहे. 

वाचा : कोंढव्यात सराईत गुंडाचा घरात घुसून खून

चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी गुप्त पध्दतीने मिळालेल्या माहितीनुसार ही यशस्वी कामगिरी केल्यामुळे पो. नि. प्रताप शिकारे आणि त्यांच्या पथकाचे कौतूक होत आहे. तीन चोरट्यांकडून इतर गुन्हांची देखील उकल होण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.  

वाचा : औरंगाबाद जिल्हा ८ हजार पार, नवे १५९ रुग्ण

तसेच जप्त केलेल्या मोटारसायकलची ओखळ पटविण्याचे काम चाळीसगाव ग्रामीण पोलिस करत आहेत. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.