Wed, Oct 28, 2020 10:40होमपेज › Nashik › मध्य रेल्वेच्या ६ विशेष गाड्या  

मध्य रेल्वेच्या ६ विशेष गाड्या  

Last Updated: Oct 02 2020 2:01AM
जळगाव : पुढारी वृत्तसेवा

मध्य रेल्वेने मुंबई ते प्रयागराज व मुंबई ते जबलपूर दरम्यान ६ विशेष गाड्या सुरु करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. या गाड्याचे आरक्षण २ तारखेपासून ऑनलाईन सुरू होणार आहे. या गाड्यांना कल्याण, नासिक, मनमाड, भुसावळ, बुरहानपूर, खंडवा असे थांबे असतील. 

लोकमान्य टिळक टर्मिनस- प्रयागराज दुरांतो विशेष ही द्वि-साप्ताहिक गाडी २ तारखेपासून सुरू होणार आहे. गाडी क्रमांक ०२२९३ दुरांतो विशेष २ तारखेपासून मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दर सोमवारी व शुक्रवारी दुपारी १७.२५ वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी प्रयागराजला १२.४५ वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०२२९४ दुरांतो विशेष  ३ तारखे पासून प्रयागराज येथून दर मंगळवार आणि शनिवारी १९.२० वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी मुंबई येथे १४.५५ वाजता पोहोचेल. 

लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई - प्रयागराज ही विशेष द्वि-साप्ताहिक गाडी क्रमांक ०२१२९ ही दि. ४ पासून लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून दर मंगळवार आणि रविवारी ०५.२३ वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी प्रयागराजला ०८.५० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०२१३० विशेष गाडी ही दि. ५ पासून प्रयागराज येथून दर सोमवारी आणि बुधवारी १८.३० वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनस, मंबई येथे २१.३० वाजता पोहोचेल.

जबलपूर – मुंबई गरीबरथ विशेष गाडी

गाडी क्रमांक ०२१८७ जबलपूर – मुंबई गरीबरथ विशेष गाडी ही दि ३ पासून दर सोमवार, बुधवार, शनिवारी १९.४५ वा. सुटेल आणि दुसर्‍या दिवशी मुंबई येथे १२.२० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०२१८८ मुंबई – जबलपूर गरीबरथ विशेष गाडी ही दि. ४ पासून दर मंगलवार, गुरुवार, रविवारी 13.30 वाजता मुंबईतून सुटेल आणि दुसर्‍या दिवशी जबलपूर येथे ०५.५५ वाजता पोहोचेल. दादर , कल्याण, नासिक, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, हरदा, इटारसी, पिपरिया, गाडरवारा, नरसिंगपूर असे या गाडीचे थांबे असतील.

 "