Tue, Sep 29, 2020 09:46होमपेज › Nashik › धुळे : गोवंश कायदा अंमलबजावणीअंतर्गत ३२ गुन्हे दाखल

धुळे : गोवंश कायदा अंमलबजावणीअंतर्गत ३२ गुन्हे दाखल

Last Updated: Aug 05 2020 7:03PM
धुळे : पुढारी वृत्तसेवा

धुळे जिल्हा पोलिस दलाने बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गोवंश कायदयाच्या अंमलबजावणी करीत एकूण ३२ गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत एक कोटी ३९ लाख ६६ हजाराचा मुददेमाल जप्त केला. तसेच कारवाईत २९ वाहने जप्त केली असून ३७९ जनावरांची मुक्तता केल्याची माहिती पोलिस अधिक्षक चिन्मय पंडीत यांनी दिली.

अधिक वाचा : जळगाव : शेतकऱ्याचा मुलगा झाला आयएएस

सध्या धुळे शहर व जिल्ह्यात कोरोनाचा प्रकोप वाढतो आहे. त्यामुळे पोलिस दलातील अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तात व्यस्त आहेत. अशा वेळीही बेकायदेशीर कत्तलीसाठी गोवंश वाहतुकीची माहिती मिळताच पोलिसांकडून तातडीने कारवाई करण्यात आली. यापुढे देखिल अशाच पध्दतीने कारवाया केल्या जाणार आहेत. दरम्यान पोलिसांविरोधात अफवा पसरविण्यात येत आहेत. अशा अफवांना बळी न पडता अवैध व्यवसायांची माहिती पोलिस प्रशासनास देण्याचे आवाहन, यावेळी पोलिस अधिक्षक चिन्मय पंडीत यांनी केले.

अधिक वाचा : नाशिक जिल्ह्यात ४६८ बाधित, ५०३ बरे; ११ मृत्यू

धुळे जिल्हा पोलिस दलाने बकरी ईद निमित्त १५ जुलै ते २ ऑगस्ट दरम्यान विशेष मोहीम राबवली. या कालावधीत अपर पोलिस अधिक्षक डॉ. राजू भूजबळ व उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना विशेष कारवाई करण्यासाठीचे नियोजन देण्यात आले. यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम, सह पशु क्रुरता अधिनियमा अंतर्गत धडक कारवाया करण्यात आल्या. यात विविध पोलिस ठाणे अंतर्गत ३२ गुन्हे दाखल करण्यात आले. यात ३७९ जनावरांना सुरक्षितपणे सोडवून शहरातील गोशाळांमध्ये पाठवण्यात आले असून २९ वाहने जप्त करण्यात आल्याची माहिती देखिल पंडीत यांनी दिली आहे.  

अधिक वाचा : नाशिक-पुणे रेल्वेमार्ग विक्रमी वेळेत पूर्ण करणार

 "