Thu, Oct 01, 2020 23:43होमपेज › Nashik › जळगाव : हतनूर धरणाचे २४ दरवाजे पूर्ण उघडले 

जळगाव : हतनूर धरणाचे २४ दरवाजे पूर्ण उघडले 

Last Updated: Aug 14 2020 10:13AM
जळगाव : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यातील धरण परिसरात गेल्या काही दिवासांपासून सतत पडत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणांची पाणी पातळीत चांगली वाढ झाली आहे. अनेक मध्यम प्रकल्प ओसंडून वाहू लागले आहेत. हतनूर धरण परिसरात पडत असलेल्या पावसामुळे धरणाचे चोवीस दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहेत. धरणातून आज, शुक्रवारी (दि. १४) ७५ हजार १२५ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. याबाबतची माहिती जळगाव पाटबंधारे विभागाचे उप कार्यकारी अभियंता यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे. 

अधिक वाचा :नाशिक जिल्ह्यात २० मृत्यू; ६४६ नवे कोरोनाबाधित

भुसावळ तालुक्यात गेल्या २४ तासांत पावसाची संततधार सुरू आहे. हतनूर धरण परिसरात गेल्या २४ तासांत ३८.४ मिमी पाऊस झाला आहे. तापी व पूर्णा नदीच्या उगम स्थानावर जोरदार पाऊस झाल्याने हतनूर धरणात मोठ्या प्रमाणात पाणी साठा झाला आहे. त्यामुळे भविष्यात अजून पाणी साठा येणार असल्यामुळे शुक्रवारी सकाळी ७ वाजता धरणाचे २४ दरवाजे पूर्ण उघडण्यात आले. यामुळे तापी नदी काठच्या गावांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. 

अधिक वाचा :न्यायालयातील महिला लिपिक ट्रकखाली ठार

जिल्ह्यात हतनूर, गिरणा, वाघूर हे तीन मोठे प्रकल्प आहे. अभोरा, मंगरुळ, सुकी, मोर, अग्नावती, हिवरा, बहुळा, तोंडापूर, अंजनी, गुळ, भोकरबारी, बोरी, मन्याड हे तेरा मध्यम प्रकल्प आहे. तर ९६ लघूप्रकल्प आहे. यातील ७ प्रकल्प यापूर्वीच १०० टक्के भरून ओव्हरफ्लो झाले आहे. त्यात आज सकाळी पुन्हा सकाळी ७ वाजता पुन्हा दुसऱ्यांदा हतनूरचे २४ दरवाजे उघडण्यात आले आहे. धरणाची पाणी पातळी २०९.८०० इतकी मीटर आहे. 

अधिक वाचा : गेल्यावर्षी ऑगस्टमध्येच ओलांडली सरासरी

 "