होमपेज › Nashik › धुळे जिल्ह्यात एकाचवेळी २१ जण पॉझिटिव्ह

धुळे जिल्ह्यात एकाचवेळी २१ जण पॉझिटिव्ह

Last Updated: May 23 2020 10:09AM
नाशिक : पुढारी ऑनलाईन 

धुळे जिल्ह्यात नव्या २१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे धुळ्यातील करोना रुग्णांनी शंभरचा आकडा गाठला असून बाधितांची एकून संख्या १०२ वर पोहचली आहे. वाढत्या रुग्ण संख्येने जिल्हा आरोग्य प्रशासनाची डोकेदुखी वाढत आहे. 

धुळे जिल्ह्यात शुक्रवारी रात्री उशिरा २१ जणांने अहवाल रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. यात जिल्हा रूग्णालय धुळे येथील ४ व हिरे रुग्णालयातील १७ रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या १०२ वर पोहोचली.