Wed, Aug 12, 2020 00:20होमपेज › Nashik › जळगाव : हतनूर धरणाचे ३२ दरवाजे उघडले 

जळगाव : हतनूर धरणाचे ३२ दरवाजे उघडले 

Last Updated: Jul 02 2020 1:58PM

संग्रहित छायाचित्रजळगाव : पुढारी वृत्तसेवा 

तापी नदीच्या उगमावर जोरदार पाऊस होत असल्याने गुरूवारी (दि.२) रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास हतनूर धरणाचे ३२ दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले आहे. त्यामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

वाचा : ... तर ठाकरे सरकार कोसळेल

जिल्ह्यात पावसाने दांडी मारली आहे. पाहिजे तसा पाऊस पडत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. तर दुसरीकडे हतनूर धरणाचे ३२ दरवाजे उघडण्यात आले आहेत. मध्य प्रदेशमधील बैतुल या ठिकाणावरून तापी नदीचा उगम आहे. याठिकाणी गेल्या काही दिवसांपासून पावसाचे आगमन झाले आहे. त्यामुळे तापी नदीला पूर आला आहे. यामुळे तापी नदीवरील हतनूर धरणाचे  सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास धरणाचे ३२ दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले आहे. सध्याची पाणी पातळी २०९.९१०  मीटर, धरणातील साठा १९२. ४० मिमी आहे. तर सध्या पाण्याचा विसर्ग ३०५१६ क्यूसेस सुरू आहे.

वाचा : .निवडणूक स्थगित, वाद मात्र कायम