Mon, Apr 12, 2021 03:54
चहलची बायको धनश्री वर्माचा 'जन्नत'वाला कातीलाना अंदाज! (video)

Last Updated: Feb 26 2021 8:19PM

पुढारी ऑनलाईन डेस्क

धनश्री वर्मा अनेकदा आपल्या मोहक अदांनी घायाळ करत असते. अलीकडेच तिने भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहलशी लग्न केले आहे. आता धनश्री वर्माने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती मालदीवच्या किनारी दिसत आहे. 

अधिक वाचा : 'मैने प्यार किया' फेम भाग्यश्रीच्या मुलीची सोशल मीडियात हवा! (photos)

या व्हिडिओमध्ये धनश्री वर्मा समुद्रकिनारी आहे आणि व्हिडिओमध्ये ग्लॅमरस स्टाईलमध्ये दिसली आहे. धनश्री वर्माने इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. 'जन्नतमध्ये काही चांगला काळ जात आहे. अशी धनश्रीने कॅप्शन दिली आहे. धनश्री वर्माचा हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. तो व्हिडिओ पोस्ट केल्याच्या अर्ध्या तासाच्या आत त्याला जवळपास ७५ हजार लाईक्स मिळाल्या.

अधिक वाचा : बेळगावी रतीला पाहून चाहते म्हणाले, सेक्सी बॉन्ड 

धनाश्री वर्माने अलीकडेच सांगितले होते की ती पंजाबी गायिका जस्सी गिलसोबत एका म्युझिक व्हिडिओमध्ये दिसणार आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर याबाबत माहिती देताना धनश्री वर्माने लिहिलं की, मोठी मोठी बातमी, ही मी आहे आणि मी जस्सी गिलसोबत आहे आणि आम्ही आमच्या नवीन गाण्यासह येत आहोत. हे गाणे आपल्याबरोबर बरेच दिवस असणार आहे. जस्सी गिल आणि मी हे गाणे करत आहोत हे सांगण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. मला तुझी गाणी नेहमीच आवडली पण हे माझं आवडते बनलं आहे. मला या गाण्याचा एक भाग बनवल्याबद्दल धन्यवाद आणि मी खूप उत्साही आहे.