Thu, Oct 29, 2020 06:47होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कोरोना संसर्ग सणासुदीच्या काळात वाढू शकतो!

कोरोनाचा संसर्ग सणासुदीत वाढू शकेल; राज्यांना सतर्कतेचा इशारा

Last Updated: Oct 01 2020 4:43PM

संग्रहीत छायाचित्रनवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

आगामी दसरा, दिवाळी आणि इतर सणासुदीच्या काळात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू शकतो, असा इशारा आरोग्य क्षेत्रातील तज्ञांनी दिला आहे. दिल्ली, केरळ आणि पंजाबमधील संसर्गाचे प्रमाण मागील काही दिवसांपासून वाढीस लागल्याने या राज्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

कोरोना संक्रमण फारसे कमी झाले नसले तरी देशभरात गुरुवारपासून अनलॉकचा पाचवा टप्पा लागू करण्यात आला आहे. या टप्प्यात ५० टक्के क्षमतेसह सिनेमागृहे उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. दिल्ली, केरळ आणि पंजाबमधील संसर्गाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन हा दुसरा सामुहिक संसर्ग असू शकतो, असेही तज्ञांनी सांगितले आहे. दमट आणि थंड हवामानाच नव्हे तर आगामी काळात अनेक सण येत असल्याने या काळातही कोरोना वाढू शकतो, त्यामुळे नागरिकांनी दक्ष राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

देशाची राजधानी दिल्ली तसेच केरळ आणि पंजाब या राज्यांत कोरोना वाढत आहे. दिल्लीमध्ये पहिला सामूहिक संसर्ग जून महिन्यात पहावयास मिळाला होता. त्यावेळी रुग्ण संख्येत दररोज तीन हजारने भर पडत होती. जुलै महिन्याच्या सुरुवातीला तसेच या महिन्याच्या अखेरीस रुग्ण संख्येत घट झाली होती.९ सप्टेंबर रोजी तब्बल ४०३९ रुग्णांची नोंद झाली होती. तर गेल्या बुधवारी ३८२७ नवीन रुग्णांची नोंद झाली होती. दिल्लीतील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता २.५ लाखांच्या वर गेली आहे.

दिल्ली, पंजाब व केरळमध्ये कोरोनाचा दुसरा 'पिक' दिसत असल्याचे नीती आयोगाचे सदस्य वी. के. पॉल यांनी सांगितले. केरळमध्ये सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात रुग्ण संख्या कमी झाली होती. पण १६ ते २२ सप्टेंबर या कालावधीत येथील रुग्णसंख्या झपाट्याने वाढली. २३ ते २९ सप्टेंबर या आठवड्यात राज्यात ५ हजार ८९८ नवीन रुग्णांची नोंद झाली. समाधानकारक बाब म्हणजे महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या मोठ्या राज्यातील कोरोनाचा संसर्ग कमी होऊ लागला आहे.

 "