Wed, Jun 23, 2021 01:30
कपिल शर्मासोबत पुन्हा सुनिल ग्रोवर दिसणार पण...

Last Updated: Jun 10 2021 5:36PM

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा ; कॉमेडी नाइट्स विद कपिल आणि द कपिल शर्मा शो मध्ये काम केलेल्या सुनिल ग्रोवरने पुन्हा एकदा या दोन्ही शो काम करण्याची तयारी दर्शवली आहे. २०१७ साली मतभेदांमुळे सुनिल ग्रोवरने कपील शर्मा सोबत काम सोडले होते. ग्रोवरनंतर द कपिल शर्मा शोमध्ये कायम कमी दिसली आहे. दरम्यान सुनिल ग्रोवरने स्वत: शो करण्यास सुरूवात केली परंतु त्यातही सुनिलला फार काही यश मिळताना दिसले नाही. 

अधिक वाचा : 'माझी दोस्ती पिंजऱ्यातील नव्‍हे जंगलातील वाघाशी'

सुनिल ग्रोवर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये तुम्ही द कपील शर्मा शो मध्ये तु पुन्हा दिसणार का विचारले गेलं. यावर सुनिल म्हणाला सध्या तरी मी एकत्र येण्याचा कोणताही विचार केला नाही. परंतु असा कोणता नवा प्रकल्प भविष्यात हातात आला आणि आम्हाला दोघांना एकत्र काम करावे लागत असल्यास मी काम करण्यास तयार आहे. 

अधिक वाचा : 'मी मरेपर्यंत भाजपमध्ये जाणार नाही'

सुनिल ग्रोवर पुन्हा द कपिल शर्मा शोमध्ये दिसणार अशा अफवा पसरत आहेत. याबाबत सुनिल म्हणाला की सध्या याबाबत मी कोणताच विचार केला नाही, या अफवांमुळे मला मनस्ताप होतो. मी या शोमध्ये काम करणार असलो तर सगळ्यांना कल्पना देऊनचा या शोमध्ये येणार आहे.

अधिक वाचा : सुशांतवरील चित्रपटाच्या प्रदर्शनास स्थगिती देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार

सुनिल ग्रोवर आणि कपिल शर्मा यांच्यात विमान प्रवासा दरम्यान वाद झाला होता. यावेळी कपिल शर्माने ट्विट करुन सुनिल ग्रोवरची माफी मागितली होती. “पाजी, जर मी तुला दुखावलो असेन तर मला माफ कर.” असे ट्विट करत कपीलने सुनिलची माफी मागितली होती. यावर सुनील ग्रोव्हरनेही एक पोस्ट शेअर करत म्हणाला पाजी, तू मला खूप दुखवले आहेस. तुझ्यासोबत काम केल्याचा एक चांगला अनुभव आहे. पण मनुष्यांचा आदर करायला शिक हा एक सल्ला आहे.