Fri, Oct 02, 2020 01:56होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘राज्यपाल आणि मुख्यमंत्री हे पिता-पुत्रासारखे’

‘राज्यपाल आणि मुख्यमंत्री हे पिता-पुत्रासारखे’

Last Updated: May 23 2020 1:15PM

संग्रहीक छायाचित्रमुंबई : पुढारी ऑनलाईन

महाराष्ट्राला सध्या कोरोना संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यातच राजकारणही चांगलेच तापू लागले आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. त्यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. अनेक तर्कवितर्क लावण्यास सुरूवात झाली. मात्र, माध्यमांशी बोलताना राज्यपालांची भेट ही सचिच्छा भेट असल्‍याचे राऊतांनी स्पष्ट केले. 

राज्यपालांच्या भेटीनंतर संजय राऊतांनी माध्यमांशी संवाद साधला. गेल्या काही खूप दिवसांपासून आमची भेट राहिली होती. ही एक सदिच्छा भेट आहे. राज्यपाल कोश्यारी आमचे मार्गदर्शक आहेत, असे उद्गार राऊत यांनी यावेळी काढले.

ते म्हणाले की, राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यातील संबंध अत्यंत मधुर आहेत. दोघांना एकमेकांबद्दल प्रेम आणि आदर आहे. राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यातील संबंध जसे पिता-पुत्राचे असतात तसेच आहेत आणि ते तसेच राहतील. आमच्यात कोणतीही दरी नाही, असेही राऊतांनी यावेळी स्पष्ट केले. 

राऊत यांनी यावेळी विरोधकांवर टीकास्त्र सोडले. संकटाच्या काळात आंदोलन करणे बरोबर नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. 

विरोधी पक्ष भाजपने राज्यात कोरोनाल रोखण्यासाठी सरकार अपयशी ठरल्याचा आरोप केला आहे. तसेच महाराष्ट्र बचाव हे आंदोलन सुरू केले आहे. संकटाच्या काळात आंदोलन छेडल्याने सत्ताधारी पक्षाकडून भाजपवर जोरदार टीका होत आहेत. 

 "