Tue, Sep 29, 2020 09:13होमपेज › Mumbai-Thane-Raigad › लहान वयाच्या पार्थ पवारांचा कोणी वापर तर करुन घेत नाही ना?; शिवसेनेचा सवाल 

लहान वयाच्या पार्थ पवारांचा कोणी वापर तर करुन घेत नाही ना?; शिवसेनेचा सवाल 

Last Updated: Aug 14 2020 9:15AM

शरद पवार आणि पार्थ पवारमुंबई : पुढारी ऑनलाईन

सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करणाऱ्या पार्थ पवार यांना शरद पवार यांनी कटू शब्दांत फटकारल्यानंतर पवार कुटुंबात कलह असल्याची चर्चा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून भाष्य केले आहे. चि. पार्थ पवार हे राजकारणात नवीन आहेत. लोकसभेची त्यांची उंच उडी चुकली आहे. त्यांना थोडी जास्त मेहनत घ्यावी लागेल. घरातच राजकीय व्यायामशाळा आहे. त्यामुळे मल्लखांब वगैरे कसरतीचे प्रयोग करुन कसदार बनायची संधी आहे. शरद पवारांचे बोलणे हे आजोबांचा सल्ला म्हणजेच आशीर्वाद यादृष्टीने घेतले तर मनावरचा ताण कमी होईल, असे शिवसेनेने म्हटले आहे.

वाचा : पार्थ पवार राष्ट्रवादी सोडणार?

सीबीआयचा घाव घालून महाराष्ट्राचा स्वाभिमान, अस्मिता जखमी करायची असा डाव पडद्यामागून रचला जात आहे, हे समजून घेतले पाहिजे. त्याकरिता लहान वयाच्या पार्थ पवारांचा कोणी वापर तर करुन घेत नाही ना? अशी शंका शिवसेनेने व्यक्त केली आहे.

वाचा : महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी बदल्यांमध्ये प्रचंड कमाई केली

संपूर्ण पवार कुटुंब हे राजकारणातले तालेवार. हा तालेवारपणा अजित पवारांपर्यंत पोहोचला, पण माणसाची जीभ नियंत्रणात नसेल तर मोठा फटका बसतो. असे फटके अजित पवार यांनी राजकीय प्रवासात अनेकदा खाल्ले. त्यामुळे अजित पवार सावध झाले. सध्या अजितदादांचा त्यांच्या जीभेवर संयम आहे. पण चि. पार्थ हे नवखे असल्याने जरा वेगात बोलतात. त्याचे पडसाद उमटतात, असे शिवसेनेने नमूद केले आहे.

वाचा : पर्युषण काळात जैन मंदिरे खुली करण्यास राज्य सरकारचा नकार

शरद पवार यांनी स्वतःच्या नातवाला जाहीरपणे कटू शब्दांत फटकारल्यानंतर पवार कुटुंबातील अस्वस्थता वाढली आहे. पार्थ पवार आपल्या आजोबांविरोधात बंड करण्याची चर्चा गुरुवारी दिवसभर सुरू होती. अजित पवारांचे पुत्र असलेले पार्थ राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याच्या मनःस्थितीत असून, भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या वाटेवर असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, राष्ट्रवादीकडून या बातम्यांचा इन्कार करण्यात आला आहे.

 "