Wed, Oct 28, 2020 10:57होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'एनडीए'तून शिवसेनेपाठोपाठ अकाली दल बाहेर पडल्याने राष्ट्रीय राजकारण बेचव : शिवसेना

'एनडीए'तून शिवसेनेपाठोपाठ अकाली दल बाहेर पडल्याने राष्ट्रीय राजकारण बेचव : शिवसेना

Last Updated: Sep 28 2020 8:32AM

शिवसेना खासदार संजय राऊतमुंबई : पुढारी ऑनलाईन

शिरोमणी अकाली दलाने कृषी बिलाला विरोध करत भाजपप्रणित एनडीएला रामराम केला. शिवसेना, तेलगू देसम पार्टीनंतर अकाली दल हा एनडीएतून बाहेर पडलेला भाजपचा तिसरा प्रमुख मित्रपक्ष आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने भाजपवर टिका केली आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून शिवसेनेपाठोपाठ अकाली दलही बाहेर पडल्याने राष्ट्रीय राजकारण बेचव झाले आहे, असे शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.

वाचा : दुबई, इंग्लंडमधून आलेल्या लोकांमुळे कोरोनाचा फैलाव 

काँग्रेस हा आजही मोठा पक्ष आहे. पण राष्ट्रीय पातळीवर निवडणुका जिंकल्याशिवाय राजकीय मोठेपणा सिद्ध होत नाही. ज्या कारणांसाठी एनडीए स्थापन झाली ते कारणच मोदींच्या झंझावातात नष्ट झाले हे सत्य स्वीकारुन नवा झेंडा फडकवावा लागेल. सध्या तरी अकाली दल हा 'एनडीए'चा शेवटचा 'खांब'ही कलथून गेला आहे. राष्ट्रीय स्तरावरील हिंदुत्वाचे राजकारणही त्यामुळे निस्तेज होताना दिसत आहे. नवा सूर्य उगवेल काय? असे शिवसेनेने म्हटले आहे.   

वाचा : आघाडीत संशयकल्लोळ!

सत्ता आली, सत्ता गेली. अनेक घटक पक्ष सोयीनुसार सोडून गेले, पण एनडीएचे दोन खांब भाजपबरोबर राहिले ते म्हणजे शिवसेना व अकाली दल. आज या दोन्ही पक्षांनी एनडीएला रामराम ठोकल्याने एनडीएत खरंच राम उरला आहे काय? असा शिवसेनेने केला आहे.

 "