Thu, Oct 01, 2020 23:57होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शाळा, कॉलेज सुरु करण्यावर केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा खुलासा

शाळा, कॉलेज सुरु करण्यावर केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा खुलासा

Last Updated: May 27 2020 10:29AM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

काही माध्यमांमध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्यांना शाळा सुरु करण्याबाबत परवानगी दिल्याचे वृत्त झळकत होते. त्यावर केंद्रीय गृह मंत्रालयाने काल (दि. 26) उशिरा मोठा खुलासा करत असा कोणताही निर्णय झाला नसल्याने देशातील शाळा, कॉलेज आणि इतर शैक्षणिक संस्था बंदच राहतील असे सांगितले आहे. 

वाचा : देशात कोरोनाग्रस्त दीड लाखांच्या पार; आतापर्यंत ४ हजारांहून अधिक बळी

शाळा, कॉलेज सुरु करण्याची परवानगी दिल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिल्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी एक वक्तव्य प्रसिद्ध केले. प्रवक्त्यांनी 'अशा प्रकारचा कोणताही निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयाने घेतलेला नाही. सध्यातरी देशातील सर्व शैक्षणिक संस्था सुरु करण्यास बंदी आहे.' असे ट्विट केले. 

वाचा : देशांतर्गत विमानसेवा सुरु होऊन दोन दिवस होत नाहीत तोपर्यंत विमानातच सापडला कोरोनाग्रस्त!

देशातील सर्व शैक्षणिक संस्था 25 मार्चला लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून बंद आहेत. काही संस्था त्याच्या आधीपासूनच बंद ठेवण्यात आल्या आहेत. हा निर्णय कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होऊ नये यासाठी घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात पहिला 21 दिवसाचा लॉकडाऊन 24 मार्चला घोषित केला होता. तो 3 मे संपत असतानाच तो 17 मे पर्यंत वाढवण्यात आला. त्यानंतर लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथीलचा आणून तो पुन्हा 31 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे.   

 "