Wed, Aug 12, 2020 00:50होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'महाजॉब्स योजना महाविकास आघाडी सरकारची, की शिवसेना-राष्ट्रवादीची?'

'महाजॉब्स योजना महाविकास आघाडी सरकारची, की शिवसेना-राष्ट्रवादीची?'

Last Updated: Jul 16 2020 11:20AM

सत्यजित तांबेमुंबई : पुढारी ऑनलाईन 

राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. यामुळे राज्यात युवक बेरोजगार झाले आहेत. या युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने महा जॉब्स ही योजना आणली आहे. या योजनेमुळे आता महाविकास आघाडीत अंतर्गत वाद असल्याचे समोर आले आहे. 

वाचा : महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्य निवडणूक आयुक्त निला सत्यनारायण यांचे कोरोनामुळे निधन 

महाराष्ट्र राज्य युवा काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी ट्विट करुन शिवसेना व राष्ट्रवादीवर टीका केली आहे. #महा_जॉब्स् ही योजना महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची आहे, की शिवसेना-राष्ट्रवादीची? आघाडीचे गठन होत असताना, ठरलेल्या किमान समान कार्यक्रमाची व त्यातील शिष्टाचारांची अंमलबजावणी का होत नाही? हा माझ्या सारख्या सामान्य काँग्रेस कार्यकर्त्याला पडलेला प्रश्न आहे, असे ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे. 

वाचा : देशात कोरोनाचा मोठा उद्रेक; एका दिवसात ३२ हजारांवर रुग्ण, ६०६ जणांचा मृत्यू