Mon, Apr 12, 2021 02:43
उपकरणे, चिकन, मटण, अंडी, मासे विक्रीस परवानगी

Last Updated: Apr 08 2021 2:46AM

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने लागू केलेल्या ‘ब्रेक दि चेन’ उपाययोजनेंतर्गत आदेशात सुधारणा करत काही सेवासुविधांचा अत्यावश्यक सेवेत समावेश केला आहे. कृषीविषयक कामे सुरू राहण्यासाठी बियाणे, खते, उपकरणे आणि त्यांची दुरुस्ती आदींसह चिकन, पोल्ट्री, मटण, अंडी, मासे विक्रीची दुकाने इत्यादीचा अत्यावश्यक सेवेमध्ये समावेश करण्यात आला आहे.

स्टॉक एक्स्चेंजेस, डिपॉझिटरीज, क्लिअरिंग कॉर्पोरेशन आणि सेबीकडे नोंदणीकृत इतर मध्यस्थ, दूरसंचार सेवा सुरू राहण्यासाठी आवश्यक अशा दुरुस्ती/देखभालविषयक बाबी, गॅस सिलिंडरचा पुरवठा, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी काही अटीसह सर्व प्रासंगिक सेवांसह सार्वजनिक वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये विमानतळावर आवश्यक त्या मालमत्तेची हाताळणी, तिकिटिंग इत्यादी सेवांचा समावेश आहे, असे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागामार्फत कळविण्यात आले आहे. 500 पेक्षा जास्त कामगार असणार्‍या उद्योगांनी आपल्या कामगारांसाठी सर्व सुविधायुक्त क्वारंटाईन सेंटर उभारावे, असे आदेशात म्हटले आहे.