Wed, Jun 23, 2021 02:35
रात्रीस खेळ चाले : सावंतवाडीकर शेवंता आपल्याविषयी काय सांगते?

Last Updated: Jun 10 2021 11:49AM

पुढारी ऑनलाईन डेस्क; अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरला टीव्ही इंडस्ट्रीत १० वर्षे पूर्ण झालेली आहेत. तिचा आतापर्यंतचा प्रवास कसा होता. रात्रीस खेळ चाले फेम शेवंता म्हणजेच अपूर्वा नेमळेकर हिने पडद्यामागे काय मेहनत घेतली, तिला कोणकोणत्या आव्हानांचा सामना करावा लागला, कोणत्या अडचणी समोर आल्या, याविषयी 'पुढारी ऑनलाईन'ने तिच्यासोबत संवाद साधला. 

May be an image of 1 person and standing

अपूर्वा नेमळेकर रात्रीस खेळ चाले या मालिकेतून घराघरात पोहोचली. या मालिकेतील तिचे शेवंताचे पात्र चांगले गाजले. ती सुरुवातीला दिसायला बारीक होती. रात्रीस खेळ चालेसाठी ती बाई दिसावी, मॅच्युअर दिसायला हवी म्हणून तिला वजन वाढवायला सांगितलं होतं. काही वर्षानंतर लोकांना असं वाटलं की, ती प्रेयसीचू, सूनेची भूमिका करू शकते. पण, जेव्हा तिने नाटकात काम केलं, तेव्हा तिला सर्वोत्कृष्ट विनोदी भूमिकेसाठी पुरस्कार मिळाला, तेव्हा लोकांना तिचा कॉमेडीचाही एक अँगल आहे, हे समजलं.

May be an image of 1 person and standing

अपूर्वाला वजनावरून ट्रोल करण्यात आलं होतं. रात्रीस खेळ चाले आधी तिचे वेबसीरीजसाठीचे शूटिंग सुरू होते, त्यावेळीही दिसायला ती बारीक होती. पण, रात्रीस खेळ चालेमध्ये अण्णा नाईक हे तिच्या वयाच्या दुप्पट होते. अण्णांना ती शोभून दिसायला हवी म्हणून तिला वजन वाढवायला सांगितलं. ती एका मुलाची आई वाटायला हवी होती, म्हणून तिने १२ किलो वजन वाढवलं होतं, असं ती म्हणते.  

May be an image of 1 person and outdoors

अपूर्वा म्हणते, कुठलीही गोष्ट सोपी नसते. त्यामुळे ही भूमिकाही माझ्यासाठी सोपी नव्हती. शेवंता हे पात्र वेगळं होतं. मी एका वेगळ्या पात्राच्या शोधात होते. मला शेवंता ही भूमिका आवडली आणि ती मी स्वीकारली. वेळेपेक्षा आधी आणि नशीबापेक्षा जास्त कधीचं काही नसतं. ज्या गोष्टी माझ्या नशीबात होत्या, त्या मला मिळणारचं. मी कार्पोरेट क्षेत्रामध्येही मी काम केलं आहे. माझी स्वत:ची इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी होती. आता सगळीकडे स्पर्धा आहेच. सर्वचं क्षेत्रात स्पर्धा असल्यामुळे संकटाचा सामना करावा लागतो, असेही तिने सांगितले.   

May be an image of 1 person and standing

तिच्यावर मध्यंतरी टीकाही झाली. ट्रोल झाल्यानंतर अपूर्वा म्हणाली, इंटरनेट, सोशल मीडिया सहजपणे उपलब्ध होतात. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करतात, लाईव्ह येतात पण, दिवसभरात खूप साऱ्या लोकांना प्रतिक्रिया देणं शक्य नसतं. लोक वजनावर, दिसण्यावर बोलतात. रात्रीस खेळ चालेमध्ये तुझी बोल्ड भूमिका आहे, तर तू तशीचं आहेस का? असेही प्रश्न कमेंट बॉक्समध्ये विचारले जातात. कधी-कधी वैयक्तिकही मेसेज केला जातो. रात्रीस खेळ चालेमध्ये तर लोक असे काही प्रश्न विचारतात की, तिथे सडेतोड उत्तर देणं भाग असतं. काहींची बौध्दिक पातळी चांगली असली की, त्यांच्या प्रश्नांना उत्तर द्यावं लागतं. पण, निगेटिव्ह कमेंट टाकल्यानंतर इमोशनल डाऊन व्हायला होतं. काही जण दु:ख होईल असे कमेंट करतात. पण, बऱ्याचवेळी मी याकडे दुर्लक्ष करते. 

May be an image of 1 person, standing, jewellery and outdoors

पहिल्या मालिकेच्या आठवणी 

आभास हा अपूर्वाची पहिली मालिका. या मालिकेच्या आठवणीविषयी बोलताना अपूर्वा म्हणाली, मी आता अशी विचार करते की, तो किती संघर्षाचा काळ होता. शूटिंगला दादर ते मालाड स्कूटीवरून जायचे. अडीच तासांचा प्रवास असायचा. पण, घरी जाण्याची वेळ मला कधीचं सांगता आली नाही. पुढे रेल्वेने प्रवास करायला लागायचा. बस, स्कूटी, रेल्वे, जेट्टी (बोट) अंधेरी ते मालाडला जोडणाऱ्या बोटीतून असा सर्व माध्यमातून मी या मालिकेसाठी प्रवास केला. ही माझ्या आयुष्यातील पहिली मालिका होती, ज्यासाठी मी इतक्या वाहतुकीच्या साधनांचा वापर केला. आभास हा या मालिकेनंतर मी गाडी घेतली. त्यानंतर सर्वचं गोष्टी चांगल्या घडत गेल्या. 

May be an image of 1 person and standing

अण्णाची शेवंता 

सावंतवाडी हे माझं गाव आहे. रात्रीस खेळ चालेमध्ये मालवणी भाषा सादर करायला ही मला संधी मिळाली होती. बाबांची इच्छी होती की, मी कोकणाल रिप्रेझेंट करावं. ही मालिका केवळ कोकणसाठीचं मर्यादित नव्हती तर महाराष्ट्र आणि संपूर्ण भारतात पाहिली गेली. कारण, सेटवर मला पंजाबी, गुजराती आणि साऊथचे लोक, चाहते भेटायला यायचे. माझं कोकण, माझं छोटंसं गाव संपूर्ण देशभरात प्रसिध्द झालं.  

May be a close-up of 1 person

हिंदीतही रात्रीस खेळ चाले

अपूर्वा पुढे म्हणते, रात्रीस खेळ चाले हिदीमध्येही डब झाली. रात का खेल है सारा असं त्या मालिकेचं नाव आहे. ही मालिका पाहून देशभरातील, आंतरराष्ट्रीय चाहतेदेखील मला कमेंट देतात.  

May be an image of 1 person

अन्‌  बाबांची आठवण झाली...

जेव्हा मला शेवंतासाठी पुरस्कार मिळाला, तेव्हा सर्वात जास्त मला माझ्या बाबांची अधिक आठवण झाली. पण, आईने ती कमी भरून काढली. ती नेहमी मला प्राेत्‍साहन देते. ती माझ्या प्रत्येक मालिका पाहते. ती माझ्या प्रत्येक नाटकाला यायची. माझा एखादा अभिनय आवडला नाही तर ती सरळ मला सांगते.  

Apurva Nemlekar Aka Shevanta's Ratris Khel Chale 2 Completes 200 Episodes!  - ZEE5 News

१० वर्षात कोणत्या गोष्टी बदलल्या? 

दहा वर्षात अपूर्वामध्ये काय बदल झाला, याबद्दल ती म्हणाली की, 'अपूर्वामध्ये या १० वर्षात खूप बदल झाला आहे. पूर्वी शूटिंगला येताना-घरी जाताना प्रवास त्रासदायक ठरायचा. चिडचिड व्हायची. पण, आता १२ तासांचा प्रवास करून मला कोकणात जायचं असतं. रात्रीचा खेळ चालेचा एक एपिसोड जरी शूट करायचा असेल तर १२ तास प्रवास करावा लागतो. रात्री जेव्हा मी गाडीत बसते, तेव्हा सकाळी जाऊन कोकणात पोहोचते. पुन्हा सकाळी फ्रेश होऊन मेकअपसाठी सीन्स करायचे असतात. २ तासांच्या प्रवासात चिडचिड करणारी अपूर्वा १२ -१२ तासांचा प्रवास करून पुन्हा मुंबईत येते, मुंबईत आल्यानंतरदेखील प्रयोग करते. ही तारेवरची कसरत अनुभवातून शिकले. १० वर्षांनंतर जेव्हा जबाबदारी येते, तेव्हा सहनशीलता आली.' 

Exclusive - Apurva Nemlekar confirms taking part in Ratris Khel Chale 3;  says, "When there is Anna Naik, there is Shevanta also" - Times of India

सकारात्मकतेविषयी अपूर्वा म्‍हणाली, 

लॉकडाऊनमध्ये घरी राहून लोकांमध्ये नकारात्मकता वाढली आहे. मी यावर एक व्हिडिओ बनवला होता. रोज ५ मिनिट देवासमोर दिवा लावा, हात जोडा आणि घरामध्ये सकारत्मकता आणा, असे अपूर्वा म्हणते.