Mon, Apr 12, 2021 03:47
कोरोनामुक्त प्रिया बापटची पहिली पोस्ट, काय म्हणाली पाहा… (Video)

Last Updated: Apr 08 2021 6:27PM

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

मराठी सिनेसृष्टीतील गोड कपल उमेश कामत आणि प्रिया बापटला कोरोनाची लागण झाली होती. कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती. त्यानंतर ते स्वत:च्या घरात क्वारंटाईन झाले होते. आता मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापट कोरोनामुक्त झाली आहे. कोरोनातून मुक्त झाल्यानंतर तिने इन्स्टाग्रामवर पहिली पोस्ट लिहिली आहे. तिने एक व्हिडिओ शेअर केला असून यामध्ये ती गाणे म्हणताना दिसत आहे. 

तिने आपल्या पोस्टमध्ये काय म्हटलंय पाहा -

तिने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये प्रियाच्या हातात एक कप आहे. ती ऐरणीच्या देवा…हे गाणं म्हणताना दिसतं आहे. हा  व्हिडिओ पोस्ट करताना प्रियाने ‘गो कोरोना गो’ अशी कॅप्शन दिली आहे. 

कोरोना झाल्यानंतर प्रियाने म्हटले होते - 

प्रियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवर म्हटले होते-“दुर्देवाने उमेश आणि माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. आम्ही दोघेही घरातच विलगीकरणात आहोत. डॉक्टरांनी दिलेली सगळी औषध घेतोय आणि त्यांनी सांगितलेल्या सर्व सुचनांचे पालन करत आहोत. गेल्या आठवड्याभरात आम्हाला जे कोणी भेटले त्यांनी करोनाची चाचणी करून घ्या.”