Wed, Oct 28, 2020 10:16होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पोलिस अधिकारीच पाडणार होते महाविकास आघाडीचे सरकार?

पोलिस अधिकारीच पाडणार होते महाविकास आघाडीचे सरकार?

Last Updated: Sep 20 2020 10:54AM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जात असल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे. या मुद्यावरून अनेक नेत्यांनी विविध दावे-प्रतिदावेही केले आहेत. दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यासंदर्भात खळबळजनक खुलासा केल्याचे समोर येत आहे. 'काही आयपीएस अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रातले महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो वेळीच हाणून पाडला गेला, असा धक्कायदायक गौप्यस्फोट त्यांनी एका मुलाखतीदरम्यान केल्याचे सूत्रांकडून समजते आहे. 

मुलाखतीदरम्यान गृहमंत्री देशमुख यांनी महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याच्या मुद्यावरून प्रश्न विचारण्यात आला. यावेळी  पोलिस खात्यातर्फे जोरदार प्रयत्न झाल्याची धक्कादायक माहिती त्यांनी सांगीतली असे समजते आहे. यासंदर्भात त्यांना अनेक थेट सवाल करण्यात आले. मात्र,  कोणाची उघड नावे न घेता पोलिस खात्यात काही अधिकारी असतात की त्यांचे नेत्यांशी जवळचे संबंध राहतात. पण याच्याबाबतीत मी जाहीर वक्तव्य करू इच्छित नाही, असे असे मत त्यांनी व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगीतले. 

दरम्यान, चुकीचे विधान माझ्या तोंडी टाकण्यात आले असल्याचे गृहमंत्री देशमुख यांनी म्हटलंय. पुणे येथे पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्या मुलाखतीबाबत स्पष्टीकरण दिले आहे. 

 "