Sun, Aug 09, 2020 14:12होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'ऑपरेशन कमळ महाराष्ट्रात चालणार नाही' 

'ऑपरेशन कमळ महाराष्ट्रात चालणार नाही' 

Last Updated: Jul 13 2020 10:02AM

शरद पवार आणि संजय राऊतमुंबई : पुढारी ऑनलाईन

भाजपच्या 'ऑपरेशन कमळ'वर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी निशाणा साधला आहे. ''ऑपरेशन कमळ याचा अर्थ सरळ सरळ सत्तेचा गैरवापर करुन लोकांनी निर्माण केलेली सरकारं दुबळी करणं, डिस्टॅबिलाईज करणं आणि त्याच्यासाठी केंद्राच्या सत्तेचा गैरवापर करणं,'' अशा शब्दांत पवार यांनी भाजपवर टिकास्त्र सोडले आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांच्या घेतलेल्या मुलाखतीचा तिसरा भाग आज प्रसिद्ध झाला. त्यात शरद पवार यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर जोरदार प्रहार केला आहे.

वाचा : 'त्यावेळी' भाजपला बाहेरुन पाठिंबा का जाहीर केला?; शरद पवारांनी केला मोठा गौप्यस्फोट 

महाराष्ट्रामध्ये ऑक्टोबर महिन्यात ऑपरेशन कमळ होईल असं सातत्यानं पसरवलं जातंय...यावर बोलताना पवार म्हणाले की, पहिल्यांदा तीन महिन्यांत सांगत होते. नंतर आता सहा महिने झाले. आता सहा महिने झाल्याच्या नंतर सप्टेंबरचा वायदा आहे. काही लोक ऑक्टोबरचा करतायेत. माझी खात्री आहे की, पाच वर्षे हे सरकार उत्तम रितीने राज्याचा कारभार करेल आणि ऑपरेशन कमळ असो की आणखी काही, त्याचा काही परिणाम उद्धव ठाकरे यांच्या सरकारवर होणार नाही, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला आहे.

वाचा : अमिताभ म्हणाले, 'कठीण समयी तुमचे खूप आभार' 

सध्याचे सरकार पाच वर्षे चालेल याच्याबद्दल माझ्या मनात शंकाच नाही आणि अशी व्यवस्थित आम्ही काळजी घेतली तर पुढच्या निवडणुकाही आम्ही एकत्र लढवू, असेही त्यांनी म्हटले आहे.

शिवसेनेसोबत आम्ही दोघेजण आहोत. आमच्या कामाची पद्धत ही नाही आणि आताचं जे सरकार आहे, ते एकट्याचं नाही. हे तिघांचे आहे आणि या तिघांच्या मध्ये दोघांची काही मतं असतील तर मतं जाणून घेण्याच्या संबंधीचीसुद्धा एक आवश्यकता आहे आणि म्हणून आमच्या लोकांची एक सूचना असते, आग्रह असतो की, आपण डायलॉग ठेवा. संसदीय लोकशाहीमध्ये डायलॉग हा कायम ठेवला पाहिजे. तो डायलॉग ठेवला तर अशी चर्चासुद्धा होणार नाही. कारण ठाकरेंच्या कामाच्या पद्धतीमध्ये आम्हाला काही उणं दिसत नाही. फक्त डायलॉग दिसत नाही, असे शरद पवार यांनी नमूद केले आहे.     

वाचा : भाजपमध्ये प्रवेश करणार असलेल्या चर्चांवर सचिन पायलट यांचं स्पष्टीकरण