Wed, May 19, 2021 04:03
कोरोना रोखायचा असेल तर लॉकडाऊन अटळ, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांचा इशारा

Last Updated: Apr 11 2021 5:20PM

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

कोरोना रोखायचा असेल लॉकडाऊन अटळ आहे, असे वक्तव्य मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केले. आज (दि. ११) ते मुंबई येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. 

मंत्री शेख पुढे म्हणाले की, मुंबईत कोरोना रुग्णसंख्या का वाढत आहे, याचा अभ्यास करणार आहे. सर्वांना विश्वासात घेऊनच लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात येणार आहे. लसीचा पुरेसा साठी उपलब्ध नाही. जिथे रुग्ण जास्त तिथे कोरोना लसीचा पुरवठा जास्त करा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. 

ते पुढे म्हणाले की, मुंबईत चार नवे जंबो सेंटर सुरू करण्यात येणार आहेत. सरकार अचानक कोणतेही निर्बंध लाढणार नाही, असेही शेख यांनी यावेळी स्पष्ट केले.