Sat, Aug 15, 2020 14:14होमपेज › Mumbai-Thane-Raigad › लालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात  

लालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात  

Published On: Jun 20 2019 7:54PM | Last Updated: Jun 20 2019 7:54PM
 

मुंबई : प्रतिनिधी

नवसाला पावणार्‍या आणि भक्तांच्या हाकेला धावणारा राजा म्हणून ओळखल्या जाणार्‍या लालबागच्या राजाचा 86 वा पाद्यपुजन सोहळा थाटामाटात पार पडला. या सोहळ्याला यंदा युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी पाद्यपुजनास उपस्थिती लावून सार्‍यांचे लक्ष वेधले. प्रत्येक मुंबईकर या ठिकाणी येतो तसाच मी आलो आहे. दरवेळी देवाकडे काही मागायचेच असते असे नाही तर कधीकधी देवाचे आभार ही मानायचे असतात. असे ठाकरे यांनी सांगितले. तसेच एक तर राज्य सरकारने एसएससीच्या विद्यार्थ्यांसाठी एक वेगळी तुकडी निर्माण करावी आणि महापालिकेचे स्वत:च ट्विटर हँडल सुरू झाले आहे त्यावर नागरिकांनी समस्या टाकाव्यात अशा माझ्या दोन मागण्या असल्याचे ठाकरे म्हणाले.

मुंबईतील सुप्रसिद्ध लालबागचा राजा गणेश मंडळाने यंदाच्या वर्षी 86 व्या वर्षात पदार्पण केले. लालबागचा राजा म्हणजे तमाम देश विदेशातील नागरिकांचे श्रद्धास्थान आहे. यंदा लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा गुरुवारी संकष्टी चतुर्तीच्या शुभ प्रसंगी पार पाडण्यात आला. अनेक भाविकांनी फुलांनी सजविलेल्या राजाच्या पायाचे दर्शन घेतले.

लालबागच्या राजाची मूर्ती त्याच ठिकाणी घडवली जाते. तब्बल 86 वर्ष कांबळी कुटुंबीयांकडून ही मुर्ती साकारण्याची सेवा करण्यात येत आहे. आमच्या तिसर्‍या पिढीकडून मूर्ती घडवण्याच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे. दरवर्षी लालबागच्या राज्याच्या मूर्तीचे वेगळे रुप पहायला मिळते यंदाच्या वर्षी राजाच्या आसनांमधून आणि रुपातले वेगळेपण नक्की भाविकांचे लक्ष वेधून घेईल असा विश्‍वास लालबागच्या राजाचे मूर्तीकार संतोष कांबळी यांनी व्यक्‍त केला.

मुंबईतील लालबाग परिसरात कोळी नागरिकांनी 86 वर्षापूर्वी या राजाच्या मुर्तीची प्रतिष्‍ठापना केली. तेव्हापासून कांबळी कुटूंबीय या राजाची मुर्ती बनवित आहेत. लालबागचा राजा हा मुंबईतला प्रसिध्द गणपती नवसाला पावत असल्याची लोकांची श्रद्धा आहे. हा गणपती चिंचोळ्या गल्लीमध्ये बसवला जातो. 

आज पासून लाल बागच्या राजाची मुर्ती साकारण्यास सुरूवात होणार आहे. लाखो भाविकांची गर्दी पाहता नागरिकांना सुरक्षित दर्शन देण्याचा यंदाचा लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा संकल्प असणार आहे.

-सुधीर साळवी, मानद सचिव , लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ