Wed, Oct 28, 2020 11:04होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आरोग्यमंत्री राजेश टोपेंकडून ऐश्वर्या राय बच्चनबाबतचे 'ते' ट्विट काही मिनिटांमध्येच डिलीट!

आरोग्यमंत्री राजेश टोपेंकडून ऐश्वर्या राय बच्चनबाबतचे 'ते' ट्विट काही मिनिटांमध्येच डिलीट!

Last Updated: Jul 12 2020 3:26PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

बिग बी अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन हे कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर करण्यात आलेल्या कोरोना टेस्टमध्ये ऐश्वर्या राय बच्चन आणि ऐश्वर्या अभिषेकची मुलगी आराध्याही कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. मात्र, जया बच्चन व इतर नातेवाईक मात्र निगेटिव्ह आल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली.

याबाबतची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही ट्विट करून दिली. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, श्रीमती ऐश्वर्या राय बच्चन व कन्या आराध्या बच्चन या देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. श्रीमती जया बच्चन यांची टेस्ट निगेटिव्ह आली आहे. बच्चन कुटुंबियांची तब्येत तंदुरुस्त व्हावी अशी आमची सदिच्छा आहे.

मात्र, त्यांनी  ते ट्विट काही कालावधीमध्येच डिलीट केल्याने सर्वांच्या भूवया उंचावल्या. त्यांनी मराठी आणि इंग्रजीतून ट्विट केले होते. परंतु त्यांनी दोन्ही ट्विट डिलीट केली आहेत. 

अधिक वाचा : ब्रेकिंग! बच्चन घराण्यात कोरोनाचा शिरकाव; ऐश्वर्या आणि मुलगी आराध्याही पॉझिटिव्ह

अधिक वाचा : अभिनेते अनुपम खेर यांच्या आई, भावासह चौघे पॉझिटिव्ह

अधिक वाचा : ‘बिग बीं’च्या प्रकृतीविषयी डॉक्टरांची नवी माहिती...

अधिक वाचा : अमिताभ, अभिषेक बच्चन कोरोनाबाधित

अधिक वाचा : अमिताभ बच्चन यांच्यानंतर अभिषेकही कोरोनाबाधित! 

अधिक वाचा : सुरक्षारक्षक कोरोनाग्रस्त झाल्याने अभिनेत्री रेखा यांचा बंगला सील!

 "