Thu, Jan 28, 2021 03:57




मंत्री नवाब मलिकांचे जावई अटकेत; एनसीबीकडून कारवाई 

Last Updated: Jan 13 2021 9:21PM




मुंबई : पुढारी ऑनलाईन

ड्रग्ज प्रकरणात आता थेट महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांच्या जावयाला एनसीबीकडून अटक करण्यात आली आहे. एनसीबीकडून मलिक यांचे जावई समीर खान यांना अटक  करण्यात आली आहे. (minister nawab malik son in law arrested by NCB)

मिळालेल्या माहितीनुसार, समीर यांनी २०० किलो ड्रग्जमधील मुख्य आरोपी करन सजनानी यांच्यात २० हजार रुपयांचा व्यवहार झाला होता. दोघांमध्ये गुगल पे वरून व्यवहार झाला असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे एनसीबीला या दोघांमध्ये ड्रग्ज खरेदी-विक्री झाल्याचा संशय आहे. या चौकशीसाठी समीर खानला एनसीबीकडून समन्स बजावण्यात आले होते. 

ड्रग्ज प्रकरणावरून एनसीबीच्या रडावर अनेक लोक आहेत. मंगळवारी प्रसिद्ध मुच्छड पानवाला रामकुमार तिवारीला अटक करण्यात आली होती. एनसीबीने वांद्रे आणि चेंबूरमध्ये सोमवारी छापा टाकला होता. यावेळी अभिनेत्री दिया मिर्झाची माजी व्यवस्थापक आणि अन्य दोघांकडून २०० किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली होती. (minister nawab malik minister son in law arrested by NCB)