Sun, Sep 20, 2020 09:09होमपेज › Mumbai-Thane-Raigad › वैद्यकीय परीक्षेसाठी आरोग्य विज्ञान विद्यापीठाने घेतला मोठा निर्णय

वैद्यकीय परीक्षेसाठी आरोग्य विज्ञान विद्यापीठाने घेतला मोठा निर्णय

Last Updated: Jun 06 2020 3:57PM

संग्रहित छायाचित्रमुंबई : पुढारी वृत्तसेवा

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्यातील सर्व वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा त्यांच्या गावातील महाविद्यालयात किंवा ते शिकत असलेल्या महाविद्यालयात घेण्याचा निर्णय आरोग्य विज्ञान विद्यापीठाने शनिवारी जाहीर केला आहे. वैद्यकीय विद्यार्थ्यांचा पहिला पेपर १५ जुलै रोजी होईल.

वाचा : आदिवासी मुलांच्या लसीसाठी सिध्दीविनायक मंदिराकडून १० कोटींचा निधी

लॉकडाऊनमुळे वैद्यकीय परीक्षा अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आल्या होत्या. राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांची नुकतीच भेट घेतली असता, राज्यपालांनी वैद्यकीय परीक्षांना मंजूरी दिली.

त्यानुसार विद्यार्थी आणि महाविद्यालयांच्या सोयीसाठी परीक्षा टप्प्याटप्प्याने घेतल्या जाणार आहेत. विद्यार्थ्यांच्या गावातील महाविद्यालय किंवा ते शिकत असलेल्या महाविद्यालयांमध्ये त्यांच्या प्रात्यक्षिक आणि लेखी परीक्षा घेतल्या जातील. परीक्षा केंद्रे बदली करण्याची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक अ. ग. पाठक यांनी यांनी सर्व वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता, प्राचार्य यांना परीक्षेबाबत सूचना दिल्या आहेत.

केंद्रीय परिषदांचे निर्देश आणि विज्ञान मंडळाच्या ठरावानुसार लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा (प्रथम वर्ष वैद्यकिय अभ्यासक्रम २०१९ वगळून) १५ जुलैपासून आयोजित करण्यात येणार आहेत. अभ्यासक्रमनिहाय प्रत्येक वर्षाच्या परीक्षेचे वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर लवकरच टाकण्यात येणार आहे.

वाचा : अखेरचा श्वास घेण्यापूर्वी वाजिदने सलमानला दिलं 'स्पेशल गिफ्ट'!

 "