होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कोण? अमित शहांनी केला खुलासा

महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कोण? अमित शहांनी केला खुलासा

Last Updated: Oct 17 2019 12:39PM

केंद्रीय गृहमंत्री अमित शहानवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असताना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मोठे वक्तव्य केले आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री बनतील आणि युतीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचा उपमुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय फडणवीस आणि त्यांची टीम घेईल, असे अमित शहा यांना एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले आहे.

राज्याचा पुढील मुख्यमंत्री भाजपाचाच असेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याआदीच स्पष्ट केले आहे.  शिवसेनेची इच्छा असेल तर आदित्य ठाकरेंना उपमुख्यमंत्रीपदी बसवू शकतात. पण हा निर्णय पूर्णपणे शिवसेनेचा असेल, असेही त्यांनी म्हटले होते. आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोण असेल यावर भाष्य केले आहे.    

निवडणुकीनंतर मुख्यमंत्री शिवसेनेचा असेल, असा दावा शिवसेना करत असल्याच्या प्रश्नावर उत्तर देताना शहा यांनी म्हटले आहे की, या गोष्टीचा युतीला धोका आहे असे मला वाटत नाही. मात्र नवीन सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस हेच भाजपचे मुख्यमंत्री असतील. फडणवीस आणि त्यांची टीम निवडणुकीतील निकाल पाहून उपमुख्यमंत्रीपदाबाबत निर्णय घेतील. तसेच यावर भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत चर्चा करुन यावर निर्णय होईल.