Thu, Jan 28, 2021 04:40
महाराष्ट्राला अपेक्षेपेक्षा लसीचे कमी डोस मिळाले : आरोग्यमंत्री राजेश टोपे

Last Updated: Jan 13 2021 3:06PM

आरोग्य मंत्री राजेश टोपेमुंबई : पुढारी  ऑनलाईन

राज्यासह देशभरात कोरोनाच्या लसीकरणाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (health minister rajesh tope) यांनी सरकारच्या कोरोना लसीकरणावर आक्षेप घेत टीका केली आहे. महाराष्ट्राला अपेक्षेपेक्षा लसीचे कमी डोस मिळाले असल्याचा आरोप आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केला. (health minister rajesh tope criticise central government over corona vaccine) ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते यावेळी त्यानी केंद्र सरकारच्या धोरणांवर नाराजी व्यक्त केली आहे. 

अधिक वाचा : पुण्यासाठी कोरोना लसीचे १ लाख १० हजार डोस

महाराष्ट्राच्या वाट्याला केंद्र सरकारकडून एकूण ९ लाख ७३ हजार लसीचे डोस देण्यात आले आहेत. बफर स्टॉकसहित राज्याच्या वाट्याला सतरा ते साडे सतरा लाख डोसची गरज आहे. सध्या ९ ते ९.५ लाख आपल्याकडे आले आहेत. याचा अर्थ ते कमी आले आहेत. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार ज्या व्यक्तीला तुम्ही डोस देत आहात, त्या व्यक्तिला पूर्ण डोस द्या अशा सुचना आहेत. परंतु अपेक्षेच्या तुलनेच ५५ टक्के डोस आलेले आहेत. त्यामुळे ८ लाख नागरिकांचे लसीकरण करायचे असताना आम्हाला ५५ टक्के म्हणजेच साधारण ५ लाखांपर्यंत लसीकरण पूर्ण करणार असल्याची माहीती माहिती मंत्री टोपे यांनी दिली.

अधिक वाचा : राज्यात फक्त निम्म्याच कर्मचार्‍यांना पहिला डोस

राज्यात कोरोनाचे लसीकरणाची तयारी सुरू आहे. दरम्यान महाराष्ट्रात १६ जानेवारीपासून लसीकरणास सुरुवात होत आहे. यावर मंत्री टोपे म्हणाले की, ८ लाख लोकांना कोरोनाची लस मिळेल अशी अपेक्षा होती परंतु त्याच्या तुलनेत लस कमी आली आहे. जी लस आलेली आहे ती आज रात्रीपर्यंत किंवा उद्या पहाटेपर्यंत सर्व विभागीय कार्यालयांमध्ये पोहोचेल. त्याचसोबत अनेक जिल्ह्यांमध्ये आज रात्री तर काही जिल्ह्यांमध्ये उद्या लस पोहोचेल असे मंत्री टोपे यांनी सांगितले.